‘आरोग्या’ साठी सरकार करणार मोठी घोषणा..? ; पहा, कोरोनाला मात देण्यासाठी काय आहे सरकारचा प्लान
दिल्ली : कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन या अर्थसंकल्पातही सरकार आरोग्य क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. 2022 च्या अर्थसंकल्पात आरोग्य पायाभूत सुविधांबाबत सरकारकडून काही मोठ्या घोषणा केल्या जातील असे अपेक्षित आहे. सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापासून रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
गेल्या अर्थसंकल्पात सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीत तिप्पट वाढ करून 2,23,846 कोटी इतका केला होता. यावेळी त्यात 18 हजार कोटी रुपयांची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. जी बिजनेसला मिळालेल्या माहितीनुसार, सरकार आरोग्य क्षेत्राच्या बजेटमध्ये 10 ते 12 टक्के वाढ करण्याचा विचार करत आहे. त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीसाठी तयार केलेला निधी यावेळीही सुरू ठेवला जाऊ शकतो. 2021 च्या बजेटमध्ये सरकारने लसीसाठी 50 हजार कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी तयार केला होता. देशात कोरोना रोखण्यासाठी एका वर्षात लसीकरणाचा आकडा 157 कोटींच्या पुढे गेला आहे.
2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने आरोग्य क्षेत्रावर भरघोस निधीची घोषणा केल्यानंतर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच सरकारने लसीकरण मोहिमेलाही गती दिली. याशिवाय या अर्थसंकल्पात सरकार पगारदार करदात्यांनाही दिलासा देऊ शकते. कोरोनाच्या काळात घरून काम केल्याने नोकरदार व्यक्तींचा खर्च वाढला आहे. इंटरनेट-ब्रॉडबँड, टेलिफोन, फर्निचर आणि वीज देयके आधीपेक्षा जास्त आहेत. अशा स्थितीत, आगामी अर्थसंकल्पात नोकरदार व्यक्तींना सरकारकडून घर भत्ता कामाची भेट मिळू शकेल, असे सांगण्यात येत आहे.
ओमिक्रॉन जाताच संपेल का कोरोना महामारी.. काय म्हणतात आरोग्य तज्ज्ञ