Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोने खरेदीआधी चेक करा नवीन भाव; पहा, आज किती रुपयांनी वाढलेत सोन्या-चांदीचे भाव ?

मुंबई : कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असताना या काळात सोने आणि चांदीच्या किंमती वाढत चालल्या आहेत. मागील सात दिवसांच्या काळात सोन्याचे दर जवळपास 390 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे भाव सुद्धा दीड हजार रुपयांनी वाढले. त्यानंतर आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे भाव 66 रुपयांनी वाढले तर चांदीचे दर 99 रुपये प्रति किलोने वाढले आहेत.

Advertisement

फेब्रुवारीसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 66 रुपयांच्या वाढीसह 47,844 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 98 रुपयांच्या वाढीसह 61701 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. शुक्रवारी सोने मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 4814 रुपये प्रति ग्रॅम होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 4698 रुपये प्रति ग्रॅम होता.

Advertisement

मागील आठवड्यात सोने दरात 390 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली होती. तर चांदीच्या दरात 1508 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ झाली होती. IBJA च्या वेबसाइटनुसार, मागील आठवड्यात सुरुवातीला सोन्याचा भाव 47,627 होता, जो शुक्रवारी वाढून 48,017 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 60,351 ने वाढून 61,859 रुपये प्रति किलोग्रॅम झाला.

Loading...
Advertisement

दरम्यान, सोने चांदी मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वर्षात सोन्याला मागणी आणखी वाढणार असून सोने 55 हजारांच्याही पुढे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता चांदीच्या बाबतीतही असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022 आणि पुढील काही वर्षे चांदीच्या मागणीत मोठी तेजी दिसून येईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले, की यावर्षात चांदी 80 हजार आणि पुढील वर्षात 1.5 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या चांदीचे दर पुन्हा 61 हजारांपर्यंत आले आहेत. त्यानुसार चांदी यावर्षी 33 टक्के आणि पुढील तीन वर्षात 250 टक्के परतावा देण्याची शक्यता आहे.

Advertisement

सोने-चांदीला अच्छे दिन..! पहा, सात दिवसात किती रुपयांनी वाढलेत भाव; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply