Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून चीनी लोकांना नकोत चीनी कंपन्यांचे फोन; पहा, चीनमध्ये कोणता स्मार्टफोन ठरलाय नंबर वन ?

मुंबई : जगातील मोबाइल मार्केटमध्ये चीनी कंपन्यांचा दबदबा आहे. मोबाइल म्हटला की एक तर तो ओप्पो, विवो कंपनीचाच असेल इतके या कंपन्यांचे मोबाइल लोकप्रिय आहेत. इतकेच नाही, तर जगातील अन्य दिग्गज मोबाइल कंपन्यांनाही चीनी कंपन्या जोरदार टक्कर देत आहेत. अनेक देशात चीनी कंपन्यांनी सॅमसंग, अॅप्पल या कंपन्यांना जोरदार झटके दिले आहेत. आज जगात चीनी स्मार्टफोनची क्रेझ दिसत असली तरी खुद्द चीनमध्ये वेगळी परिस्थिती आहे.

Advertisement

चिनी लोकांनी येथे चीनी कंपन्यांचे स्मार्टफोन खरेदी करणे बंद केले आहे आणि त्याऐवजी अॅप्पल कंपनीच्या लेटेस्ट आयफोनला प्राधान्य दिले आहे. परिस्थिती अशी आहे, की अॅपल चीनमध्ये नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. इतकेच नाही तर कंपनीने सलग 8 आठवडे चीनच्या टॉप स्मार्टफोन ब्रँडमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.

Advertisement

चीनी कंपन्यांचे स्मार्टफोन जगभर पसंत केले जातात. भारताची नंबर-1 स्मार्टफोन कंपनी Xiaomi ही देखील चीनी कंपनी आहे. भारतातील 10 पैकी 8 स्मार्टफोन चिनी कंपन्यांचे आहेत. भारतातील टॉप-5 कंपन्यांमध्ये सॅमसंग वगळता सर्व चिनी कंपन्यांचा कब्जा आहे. Apple चीनमध्ये केवळ सर्वाधिक स्मार्टफोन विकत नाही, तर चीनमध्ये कमाईच्या बाबतीत नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. चीनच्या साप्ताहिक स्मार्टफोन ट्रॅक काउंटरपॉईंट संशोधन अहवालानुसार, iPhone 13 मालिका सुरू झाल्यापासून Apple हा चीनचा नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड आहे.

Loading...
Advertisement

तेव्हापासून अॅपल स्मार्टफोन बाजारात आघाडीवर आहे. अ‍ॅपलला चिनी स्मार्टफोन ब्रँड विवोकडून तगडी टक्कर मिळत आहे. वास्तविक, अमेरिकेत Huawei कंपनीच्या बंदीचा अॅपलला मोठा फायदा होत आहे. बंदीमुळे हुवेईला उत्पादनाच्या दृष्टीने गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

काउंटरपॉइंट रिसर्चचे संचालक टॉम कांग यांच्या मते, ब्रँड आणि गुणवत्तेच्या बाबतीत अॅपलची दमदार कामगिरी पुढे चालू राहू शकते. याचे एक कारण म्हणजे, iPhone 13 ची कमी किंमत. याबरोबरच iPhone 13 चा नवा कॅमेरा आणि 5G कनेक्टिव्हिटी देखील विक्री वाढण्याचे कारण आहे. Apple चे बेस मॉडेल iPhone 13 चीनमध्ये खूप पसंत केले जात आहे. यानंतर iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 Pro चा क्रमांक येतो. चीनमध्ये iPhone 12 सीरीजच्या iPhone 12 ची विक्रीही चांगली आहे.

Advertisement

बाब्बो.. चीनी कंपन्यांचा बनावट कागदपत्रांचा कट.. ‘या’ देशाचे होतेय अब्जावधींचे नुकसान; पहा, कुणी केलाय ‘हा’ धक्कादायक खुलासा

Advertisement
Advertisement

Leave a Reply