अर्र.. घ्या.. आता.. हक्काच्या पैशांसाठीही होतोय मनस्ताप..! पहा, ‘त्या’ प्रकरणी किती लोकांना मिळालेत त्यांचे पैसे ?
मुंबई : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारासह देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा निर्बंध कठोर केले जात आहेत. याचा फटका विमान कंपन्यांनाही बसला आहे. अनेक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहे. या फ्लाइटसाठी लोकांनी आधीच तिकीट बुक केले होते. मात्र, आता या प्रवाशांना त्यांचे पैसे परत करण्याची जबाबदारी कंपन्यांवर आली आहे. मात्र, लोकांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्यातही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण, फ्लाइट तिकीट रद्द केलेल्या एक तृतीयांशपेक्षा कमी लोकांना परतावा मिळाला आहे. एका ऑनलाइन सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
ऑनलाइन कम्युनिटी प्लॅटफॉर्म LocalCircles च्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, कोरोनामुळे ज्यांना हॉटेल बुकिंग रद्द करावे लागले त्यापैकी केवळ 34 टक्के लोकांना त्यांचे पैसे परत मिळाले. या सर्वेक्षणात देशातील 332 जिल्ह्यांतील लोकांकडून 20 हजारांपेक्षा जास्त अधिक उत्तरे मिळाली आहेत.
ओमिक्रॉन स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे अशा अनेक लोकांना त्यांचे प्रवास रद्द करावे लागले किंवा पुढे ढकलावे लागले ज्यांनी जानेवारी ते मार्च दरम्यान तिकीट बुक केले होते. त्यापैकी काहींनी एअरलाइन्स आणि हॉटेल्सना बुकिंगसाठी जमा केलेली रक्कम परत करण्यास सांगितले आहे. सर्वेक्षणातील पहिला प्रश्न हवाई प्रवास रद्द करण्याबाबत होता, ज्यावर 29 टक्के लोकांनी सांगितले की, “ट्रॅव्हल एजंट आणि एअरलाइन कंपन्यांनी रद्द करणे स्वीकारले आहे आणि पूर्ण रक्कम परत केली आहे. तर 14 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना काही प्रमाणात रक्कम मिळाली आहे.
त्याच वेळी, 29 टक्के लोकांनी फारच कमी पैसे परत केल्याचेही सांगितले. सुमारे 14 टक्के लोकांच्या मते, त्यांना पैसे परत केले गेले नाहीत परंतु त्यांची तिकिटे नंतरच्या तारखेसाठी बुक केली गेली. लोकल सर्कलचे संस्थापक सचिन तापडिया म्हणाले, की “कोविड आजार सुरू राहेपर्यंत, प्रवासी बुकिंग रद्द करण्यासाठी, विशेषत: एअरलाइन्स आणि हॉटेल्ससाठी सरकारने विशेष परतावा धोरण आणले पाहिजे, असे मत लोकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. देशभरात दररोज 2.5 लाखांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. देशात कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणेही वेगाने वाढत आहेत. ओमिक्रॉनची नवीनतम प्रकरणे समोर आल्यानंतर, देशातील या नवीन प्रकाराच्या एकूण प्रकरणांची संख्या आता 7,743 वर पोहोचली आहे.
घर-कार खरेदी सध्या नकोच..! म्हणून लोक टाळताहेत मोठा खर्च; पहा, नेमके काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात