Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदीला अच्छे दिन..! पहा, सात दिवसात किती रुपयांनी वाढलेत भाव; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज ?

मुंबई : कोरोना काळात देशातील सोने मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे भाव सातत्याने कमी जास्त होत आहेत. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून सोन्याचे भाव वाढताना दिसत आहे. इतेकच नाही तर मागील आठवड्यात सोन्याच्या किंमती जवळपास 390 रुपयांनी वाढल्या आहेत. या काळात चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे.

Advertisement

या व्यापार सप्ताहात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 390 रुपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 1508 रुपयांची वाढ झाली आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (10-14 जानेवारी दरम्यान) सोन्याचा दर 47,627 होता, जो शुक्रवारपर्यंत 48,017 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, चांदीचा भाव 60,351 रुपयांवरून 61,859 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

Advertisement

10 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 47,627 प्रति 10 ग्रॅम होता, त्यानंतर 11 जानेवारी रोजी 47,705 रुपये, 12 जानेवारीला 47,943 रुपये, 13 जानेवारी रोजी 48,031 रुपये आणि 14 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 48,017 रुपये प्रति दहा ग्रॅम असा होता. या काळात चांदीच्या भावातही वाढ झाली. 10 जानेवारी रोजी चांदी 60,351 रुपये प्रति किलो, 11 जानेवारीला 60,440 रुपये, 12 जानेवारी रोजी 60,831 रुपये, 13 जानेवारी रोजी 61,753 रुपये आणि 14 जानेवारी रोजी चांदीचा भाव 61,859 प्रति किलो असा होता.

Advertisement

दरम्यान, सोने चांदी मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वर्षात सोन्याला मागणी आणखी वाढणार असून सोने 55 हजारांच्याही पुढे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता चांदीच्या बाबतीतही असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022 आणि पुढील काही वर्षे चांदीच्या मागणीत मोठी तेजी दिसून येईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले, की यावर्षात चांदी 80 हजार आणि पुढील वर्षात 1.5 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या चांदीचे दर पुन्हा 61 हजारांपर्यंत आले आहेत. त्यानुसार चांदी यावर्षी 33 टक्के आणि पुढील तीन वर्षात 250 टक्के परतावा देण्याची शक्यता आहे.

Advertisement

सोनं तर सोनं आता चांदी पण..! जाणून घ्या, आगामी काळात चांदी करणार कोणते रेकॉर्ड..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply