Take a fresh look at your lifestyle.

इंटरनेटसाठी ‘हे’ आहेत काही स्वस्त ब्रॉडबँड प्लान; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

मुंबई : कोरोनाच्या सध्याच्या काळात बहुतांश कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. त्यामुळे कर्मचारी घरुन काम करत आहेत. या काळात ऑनलाइन कामकाज वाढले असून इंटरनेटच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. इंटरनेटची मागणी पाहता कंपन्यांनीही काही प्लान नव्याने सादर केले आहेत. ज्यामध्ये इंटरनेट डेटासह आणखीही काही फायदे देण्यात येत आहेत. अधिक डेटा असलेल्या प्लान्सना अजूनही मागणी आहे. जर तुम्ही घरून काम करत असाल आणि कमी खर्चात अधिक डेटा आणि दीर्घ वैधता असलेला प्लान शोधत असाल, तर तुम्हाला काही खास डेटा प्लानची माहिती देणार आहोत जे 500 रुपयांपेक्षा कमी आहेत.

Advertisement

जिओचा सर्वात स्वस्त बॅाडबँड प्लान 30 Mbps चा इंटरनेट स्पीड देतो. या प्लानची किंमत 399 रुपये आहे. प्लानची FUP मर्यादा 3.3TB आहे. जिओ फायबरच्या 30 Mbps प्लानचा वापर करुन एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर तुम्ही इंटरनेट वापर करू शकता.

Advertisement

एअरटेलच्या प्लानची किंमत 499 रुपये आहे. यामध्ये कंपनी ग्राहकांना 40 Mbps इंटरनेट स्पीड देते. या प्लानमध्येही ग्राहकांना एकूण 3.3TB डेटा मिळतो. हा प्लान अमर्यादीत इंटरनेट तसेच FUP मर्यादेपर्यंत अमर्यादीत स्थानिक आणि STD कॉल ऑफर करतो. या प्लानमध्ये आणखीही बरेच फायदे मिळतात.

Advertisement

सरकारी कंपनी बीएसएनएल सुद्धा चांगले इंटरनेट प्लान देत आहे. कंपनीचा सर्वात स्वस्त फायबर बेसिक प्लान 449 रुपयांचा आहे आणि कंपनी 30 Mbps चा इंटरनेट स्पीड ऑफर करते. हा प्लान 3.3TB च्या FUP मर्यादेसह येतो. डेटा मर्यादा संपल्यानंतरही ग्राहकांना 2 Mbps इंटरनेट स्पीड कंपनी देते. या प्लानच्या पहिल्या बिलावर कंपनी 500 रुपयांपर्यंत सवलत देते.

Advertisement

इंटरनेटचा वापर वाढलाय..! मग, ‘हे’ आहेत काही स्वस्त ब्रॉडबँड प्लान; जाणून घ्या, काय आहे तुमच्या फायद्याचे

Advertisement
Advertisement

Leave a Reply