Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या PLI योजनेत अंबानीही रेसमध्ये; पहा नेमका काय फायदा होणार उद्योजकांना

मुंबई : रिलायन्स न्यू एनर्जी सोलर (रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी), ह्युंदाई ग्लोबल मोटर्स, ओला इलेक्ट्रिक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रो या दहा कंपन्यांनी योजनेअंतर्गत निविदा सादर केल्या आहेत. ज्यांना प्रगत केमिकल सेल (ACC) बॅटरी स्टोरेजसाठी 18,100 कोटी रुपयांचे उत्पादन प्रोत्साहन मिळणार आहे. सरकारने PLI योजना ‘नॅशनल अॅडव्हान्स्ड केमिकल सेल (ACC) बॅटरी स्टोरेज प्रोग्राम’ ला 50 GW प्रति तास उत्पादन क्षमता प्राप्त करण्यासाठी मंजूरी दिली होती. या योजनेंतर्गत उत्पादन केंद्र दोन वर्षांत स्थापन करावे लागेल. यानंतर प्रोत्साहनपर रक्कम पाच वर्षांत वितरित केली जाईल.

Advertisement

बड्या कंपन्यांसह अमरा राजा बॅटरीज, एक्साइड इंडस्ट्रीज, राजेश एक्सपोर्ट्स, इंडिया पॉवर कॉर्पोरेशन आणि लुकास-टीव्हीएस यांनीही निविदा भरल्या आहेत. “आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधानांच्या आवाहनाच्या अनुषंगाने जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताच्या प्रभावी प्रगतीवर उद्योगांनी त्यांचा विश्वास व्यक्त केला आहे,” असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. जगातील बडे श्रीमंत मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक महत्वाच्या उद्योगपतींच्या कंपन्या यासाठी रेसमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ही महत्वाची स्कीम आणलेली आहे. (Modi Govt PLI Scheme)

Advertisement
Advertisement

Leave a Reply