Take a fresh look at your lifestyle.

वाहनांची काळजी घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच..! वाहनांचे ‘आरोग्य’ सुधारेल; खर्चाचे टेन्शनही होईल कमी..

अहमदनगर : देशात इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांची मागणी वाढत असली तरी, तरीही मोठ्या संख्येने लोकांकडे पेट्रोल आणि डिझेलची वाहने आहेत. कार जुनी झाली की, बहुतेक लोक तक्रार करतात की त्यांच्या कारचे मायलेज कमी झाले आहे. मात्र आपण जर वाहनांची योग्य काळजी घेतली तर दुचाकी किंवा चारचाकी कोणतेही वाहन असो ते व्यवस्थित राहिल. चला तर मग, वाहनांचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काय महत्वाचे आहे हे जाणून घेऊ या..

Advertisement

असे म्हटले जाते की ज्या वाहनाची योग्य आणि वेळेवर देखभाल दुरुस्ती केली जाते त्या वाहनांना अन्य देखभाल दुरुस्ती नसलेल्या वाहनांच्या तुलनेत 40 टक्के कमी इंधन लागते. जेव्हा इंजिन ऑइल कमी होते किंवा फिल्टर अडकलेले असतात तेव्हा इंधनाचा वापर वाढतो. इतकेच नाही तर वाहनाच्या टायरला योग्य दाब नसला तरीही तुमची कार जास्त इंधनाचा वापर करेल. वाहनांच्या देखभाल दुरुस्ती दरम्यान या सर्व गोष्टी दुरुस्त केल्या पाहिजेत.

Advertisement

एका अहवालानुसार, तुमची कार सुरू तर आहे पण चालत नसली तरीही प्रति तास 3 लीटर इंधन वापरते. त्यामुळे तुम्ही जर वाहतूक कोंडीत अडकलात किंवा एखाद्या सिग्नल येथे दहा सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास शक्यतो वाहन बंद करणे योग्य ठरेल. अनेक नवीन वाहनांमध्ये हे काम आता आपोआप होते, ज्यामुळे मायलेज वाढण्यास मदत होते.

Advertisement

आकडेवारीनुसार, जास्त वेगाने वाहन चालवल्याने कारचे मायलेज 15 ते 30 टक्क्यांनी कमी होते. कार नेहमी योग्य गियरमध्ये आणि सरासरी वेगाने चालवा. ट्रॅफिकमध्ये किंवा ज्या ठिकाणी वारंवार ब्रेक लावावा लागतो अशा ठिकाणी अतिवेगाने वाहन चालवून काही उपयोग नाही.

Advertisement

वाहनात चांगले इंधन भरण्याबरोबरच किमान किती इंधन भरले पाहिजे हेही कळले पाहिजे. कारमध्ये नेहमी एक चतुर्थांश अधिक इंधन असण्याचा प्रयत्न करा. जर तेल 1/4 पेक्षा कमी असेल तर मायलेज कमी होण्याचा धोका आहे.

Advertisement

कारमध्ये जास्त वजन टाकणे टाळा. कधी-कधी दूरच्या प्रवासाला जाताना कारमध्ये जास्त वस्तू आपण ठेवतो त्यामुळे वजन कारचे मायलेज कमी होते. जड वस्तूंचा थेट परिणाम इंजिनवर होतो. त्यामुळे अनावश्यक वजनाच्या वस्तूही वाहनात टाकणे शक्यतो टाळले पाहिजे.

Advertisement

सरकारने इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगच्या नियमात केलाय बदल; जाणून घ्या, काय आहे सरकारचा प्लान

Advertisement
Advertisement

Leave a Reply