दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग पायाभूत सुविधा देशात मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने सुधारित नियम जारी केले आहेत. यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांना आधिक प्रोत्साहन मिळेल, असे सांगण्यात येत आहे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इलेक्ट्रिक वाहनधारक त्यांच्या घरी किंवा कार्यालयात विद्यमान वीज कनेक्शन वापरून ही वाहने चार्ज करण्यास सक्षम असतील.
ऊर्जा मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने 14 जानेवारी 2022 रोजी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुधारित एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके जारी केली आहेत. सुरक्षित, विश्वासार्ह, सुलभ आणि किफायतशीर चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. किफायतशीर चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होईल. लोक या वाहनांचा प्राधान्याने विचार करतील असे सांगण्यात येत आहे.
कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकते, अशी स्टेशन तांत्रिक तसेच सुरक्षा आणि प्रदर्शन मानके आणि प्रोटोकॉलची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीच्या काळात चार्जिंग स्टेशन आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक बनवण्यासाठी, यासाठी वापरण्यात येणारी जमीन महसूल भागीदारी मॉडेल बनवण्यात आले आहे.
सरकारी ताब्यात असलेली जमीन सरकारी युनिट्सना महसूल भागीदारी मॉडेलच्या आधारावर सार्वजनिक चार्जिंग स्टेशन करण्यासाठी परवानगी दिली जाईल. या अंतर्गत, जमिनीची मालकी असलेल्या एजन्सीला 1 रुपया kWh चा निश्चित दर दिला जाईल. PCS हे पेमेंट तिमाही आधारावर करेल.
देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलर विक्री 2021 मध्ये वर्षभराच्या आधारावर 132 टक्क्यांनी वाढली आहे. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (SMEV) ने ही माहिती दिली आहे. हाय-स्पीड आणि लो-स्पीडसह इलेक्ट्रिक दुचाकींची एकूण विक्री 2,33,971 पर्यंत वाढली आहे. तर 2020 मध्ये 1,00,736 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या होत्या.
आकर्षक किमती, कमी खर्च आणि कमी देखभाल यामुळे ग्राहक आता मोठ्या प्रमाणात पेट्रोलवरून इलेक्ट्रिक दुचाकींकडे वळू लागले आहेत, अशी माहिती उद्योग संस्थेने दिली. SMEV ने सांगितले की, हाय-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी, ज्यांचा वेग 25 किमी प्रतितास पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे, त्यांच्या विक्रीत 425 टक्के वाढ झाली आहे.
अर्र.. घ्या.. आता इलेक्ट्रिक कंपन्यांही देणार डोकेदुखी..! पहा, ‘त्या’ कंपनीने काय घेतलाय निर्णय