Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फक्त 5 वर्षात सरकार देणार 12 लाख रोजगार; पहा, कोणत्या राज्याने तयार केलाय ‘हा’ प्लान

रायपूर : देशात कोरोनाच्या संकटात अनेक लोकांना रोजगार गमवावे लागले. बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहिले. या संकटातून मार्ग काढून नवीन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे प्रयत्न करत आहेत. यामध्ये आता काँग्रेसशासित छत्तीसगड सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगड सरकारने येत्या 5 वर्षांत राज्यात 12 ते 15 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “रोजगार मिशन” तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी येथे सांगितले की, राज्यात येत्या 5 वर्षांत 12 ते 15 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, राज्य सरकारने छत्तीसगड रोजगार मिशन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की राज्याचे मुख्य सचिव हे उपाध्यक्ष आणि प्रधान सचिव हे मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

Advertisement

ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने राज्यात अनेक नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जिल्ह्याचे उत्पन्न आणि जीवनमानात वाढ झाली आहे.

Loading...
Advertisement

ते म्हणाले की, मिशनच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात आयोजित करण्यात येणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमांबरोबर समन्वय साधला जाईल. मिशनचे इतर सदस्य संचालक उद्योग, संचालक तंत्रशिक्षण, रोजगार व प्रशिक्षण, संचालक मत्स्यव्यवसाय, व्यवस्थापकीय संचालक ग्रामोद्योग, हस्तकला विकास मंडळ, खादी मंडळ, व्यवस्थापकीय संचालक राज्य ग्रामीण उपजीविका अभियान, मुख्य कार्यकारी अधिकारी गोधन न्याय मिशन हे असतील. मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका महिन्याच्या आत मिशनबाबत कृती आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या प्रोत्साहन विभागाने म्हटले आहे, की सरकार देशातील स्टार्टअप युनिट्सना आणखी प्रोत्साहन देऊन येत्या चार वर्षांत 20 लाख नवीन रोजगार संधी निर्माण करू इच्छित आहे. विभागाचे सचिव अनुराग जैन यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली होती. सरकार स्टार्टअपना प्रोत्साहन देईल, ज्यामुळे पुढील चार वर्षांत (2025 पर्यंत) 20 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सरकारकडे नोंदणीकृत स्टार्ट-अप युनिटमध्ये 6.5 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

Advertisement

DPIIT ने 2016 पासून 60 हजारांहून अधिक स्टार्टअप नोंदणी केली आहे. प्रत्येक स्टार्टअपमध्ये सरासरी 11 लोक काम करतात. स्टार्टअप आपल्या देशात क्रांतिकारी बदल घडवत आहेत. नोकरी शोधणारे नोकरी देणारे बनत आहेत. सरकारचा अंदाज आहे, की स्टार्टअप क्षेत्रातील थेट नोकऱ्यांमुळे सरासरी तीन अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. विभागाच्या कामगिरीबद्दल माहिती देताना जैन म्हणाले होते की, 14 क्षेत्रांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजना गेल्या काही महिन्यांत जारी करण्यात आल्या आहेत. देशातील व्यवसाय सुलभतेचे वातावरण आणखी सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करेल.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply