Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोनं तर सोनं आता चांदी पण..! जाणून घ्या, आगामी काळात चांदी करणार कोणते रेकॉर्ड..?

मुंबई : सोने चांदी मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वर्षात सोन्याला मागणी आणखी वाढणार असून सोने 55 हजारांच्याही पुढे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता चांदीच्या बाबतीतही असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022 आणि पुढील काही वर्षे चांदीच्या मागणीत मोठी तेजी दिसून येईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले, की यावर्षात चांदी 80 हजार आणि पुढील वर्षात 1.5 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या चांदीचे दर पुन्हा 61 हजारांपर्यंत आले आहेत. त्यानुसार चांदी यावर्षी 33 टक्के आणि पुढील तीन वर्षात 250 टक्के परतावा देण्याची शक्यता आहे.

Advertisement

पृथ्वी फिनमार्टचे संचालक मनोजकुमार जैन यांनी सांगितले, की यंदा चांदी 74 हजार आणि तीन वर्षात एक लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानुसार चांदी 67 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देऊ शकते. जागतिक अहवालात नमूद केल्यानुसार, 2022-24 दरम्यान चांदीची मागणी 25 ते 30 टक्के वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच, आगामी काळात चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

ब्रिटेन येथील सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या मते, मागील 5 वर्षांपासून चांदीच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, दुसरीकडे सन 2017 पासून चांदीच्या खाणकामात घट होत आहे. तरी देखील चांदीच्या मागणीत मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, सध्या कोरोनाचा धोका वाढत असताना आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यास मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. सध्या सोन्याचे भाव 48 हजारांच्या दरम्यान आहे. असे असले तरी आगामी काळात सोन्याचे दर 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

वाव.. आजपासून मिळतेय स्वस्त सोने खरेदीची संधी; जाणून घ्या, केंद्र सरकारच्या योजनेची महत्वाची माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply