मुंबई : कोरोनाच्या सध्याच्या काळात बहुतांश कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. त्यामुळे कर्मचारी घरुन काम करत आहेत. या काळात ऑनलाइन कामकाज वाढले असून इंटरनेटच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. इंटरनेटची मागणी पाहता कंपन्यांनीही काही प्लान नव्याने सादर केले आहेत. ज्यामध्ये इंटरनेट डेटासह आणखीही काही फायदे देण्यात येत आहेत. अधिक डेटा असलेल्या प्लान्सना अजूनही मागणी आहे. जर तुम्ही घरून काम करत असाल आणि कमी खर्चात अधिक डेटा आणि दीर्घ वैधता असलेला प्लान शोधत असाल, तर तुम्हाला बीएसएनएलच्या सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त वर्क फ्रॉम होम प्लानबद्दल सांगणार आहोत.
BSNL चे स्पेशल टेरिफ व्हाउचर (STV) प्लान अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर करते. या प्लॅनमध्ये दररोज 5GB डेटा मिळतो. 5GB डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 80 Kbps पर्यंत कमी केला जातो. ही योजना कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100 मोफत एसएमएस ऑफर करते. या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे. हा प्लान 599 रुपयांचा आहे.
BSNL 251 रुपये किमतीचा वर्क-फ्रॉम-होम प्रीपेड प्लान देखील ऑफर करते. या प्लानमध्ये 30 दिवसांसाठी 70GB डेटा उपलब्ध आहे. हा प्लॅन डेटा-विशिष्ट आहे आणि युजर्सना या प्लानसह कॉल किंवा एसएमएसचा लाभ घेण्यासाठी वेगळे रिचार्ज करावे लागेल. त्याच वेळी, 151 रुपये किंमतीचा वर्क-फ्रॉम-होम प्रीपेड प्लान 30 दिवसांच्या वैधतेसाठी 40GB ऑफर करतो. हे सर्व रिचार्ज संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी लागू आहेत.
बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानची किंमत 699 रुपये आहे. जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये हा प्लान रिचार्ज केला तर तुम्हाला यात एकूण 180 दिवसांची वैधता मिळेल. म्हणजेच एकूण 6 महिने तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय हा प्लान सुरू राहिल. प्लानमध्ये, तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 0.5Gb डेटा मर्यादा मिळेल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40 kbps होईल. अशा परिस्थितीत या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरता येणार आहे.
या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळत आहे. याशिवाय तुम्हाला दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळेल. BSNL चा हा रिचार्ज प्लान कमी किमतीत चांगले फायदे देणारा आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलबरोबरच तुम्हाला दीर्घकालीन वैधता देखील मिळत आहे.
दरम्यान, सरकारी प्रयत्नांमुळे भारतीय 4G आणि 5G तंत्रज्ञान विकसित झाले आहे. BSNL 4G पीओसी च्या अंतिम टप्प्यात आहे. 4G स्पेक्ट्रम घेण्यासाठी सरकारने BSNL ला निधी देखील दिला आहे. या सर्व निर्णयांमुळे बीएसएनएलला अत्यंत स्पर्धात्मक परिस्थितीत टिकून राहण्यास मदत झाली आहे. आता सरकारी BSNL ला 20 लाखाहून अधिक घरांना हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी मदत करत आहे. सध्याचे सरकार किफायतशीर दूरसंचार सेवा सर्वात गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचण्याासाठी पारदर्शकपणे काम करत आहे.
वाव.. फक्त एकदाच रिचार्ज करा, 6 महिने टेन्शनच नाही; पहा, कोणत्या कंपनीचा आहे ‘हा’ भन्नाट प्लान