Take a fresh look at your lifestyle.

.. तर पाकिस्तानवर येणार आणखी एक संकट; जाणून घ्या, काय सुरू आहे शेजारच्या देशात ?

दिल्ली : पाकिस्तान सध्या अत्यंत संकटात सापडला आहे. देशात कोरोना संकट असताना महागाईत वाढ झाली आहे. आता तर सरकार स्वतः मिनी बजेटच्या नावाखाली महागाईत आणखी वाढ करणार आहे. सरकारच्या या धोरणांमुळे लोकांना तर झटका बसला आहेच पण आता सरकारसाठीही धक्का देणारी बातमी मिळाली आहे.

Advertisement

नुकत्याच आलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे, की जर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) उपक्रम या वर्षाच्या जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पुन्हा सुरू झाला नाही तर चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे अडचणीत येईल.

Advertisement

पॉलिसी रिसर्च ग्रुपच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पाकिस्तानला 8.638 अब्ज डॉलरची रक्कम बाह्य कर्जापोटी द्यावी लागेल. गेल्या चार वर्षांत विदेशी कर्जाचे देणे तब्बल 399 टक्क्यांनी वाढले आहे. 2017-18 मध्ये ते 286.6 अब्ज रुपये होते आणि आता ते 1,427.5 अब्ज रुपये होणार असल्याचा अंदाज आहे.

Advertisement

पाकिस्तानची चालू खात्यातील तूट (CAD) आणि परकीय चलनाच्या साठ्यात वेगाने घट होत आहे. पहिल्या सहामाहीत (जुलै-डिसेंबर) विदेशाकडून 3 अब्ज डॉलर, IMF कडून 2 अब्ज अमेरिकन डॉलर आणि आंतरराष्ट्रीय Eurobonds द्वारे 1 बिलियन पेक्षा जास्त कर्ज घेतले आहे असे असताना स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) कडे 31 डिसेंबर 2021 पर्यंत केवळ 17.6 अब्ज डॉलर परकीय चलन साठा होता.

Advertisement

जुलै 2021 मध्ये स्टेर बँक ऑफ पाकिस्तानकडे परकीय चलन साठा 17.8 अब्ज डॉलर होता. पॉलिसी रिसर्च ग्रुपच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे 6 अब्ज डॉलरचा ओघ असूनही परकीय चलनाचा साठा वाढू शकला नाही. पाकिस्तान सध्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे, कारण देशाची व्यापार तूट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महागाई वाढत आहे आणि आयएमएफच्या काही मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला करात वाढ करण्यासाठी मिनी बजेट तयार करावे लागले आहे.

Advertisement

जागतिक बँकेने पाकिस्तान बाबत व्यक्त केलाय मोठा अंदाज; पहा, नेमके काय म्हटलेय अहवालात

Advertisement
Advertisement

Leave a Reply