Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आता नव्या वर्षातही ‘त्या’ पैशांचा साठा घटला; सोन्यानेही दिलाय झटका; जाणून घ्या, काय आहे कारण ?

मुंबई : नवीन वर्षातही देशाच्या परकीय चलन साठ्यात होत असलेली घट थांबलेली नाही. मागील वर्षाप्रमाणेच नवीन वर्षातील पहिल्या आठवड्यात परकीय चलन साठा घटला आहे. 7 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा तब्बल 87.8 कोटी डॉलरने घसरून 632.736 अब्ज डॉलर झाला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात परकीय चलनाचा साठा कमी झाला आहे. परकीय चलनाचा साठा कमी होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले मानले जात नाही.

Advertisement

शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 31 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा १.४६६ अब्ज डॉलरने घसरून ६३३.६१४ अब्ज डॉलरवर आला होता. तर 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात हा चलन साठा 642.453 च्या विक्रमावर पोहोचला होता.

Advertisement

RBI च्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 7 जानेवारी रोजी संपलेल्या अहवाल आठवड्यात परकीय चलन साठ्यात घट होण्याचे कारण म्हणजे परकीय चलन मालमत्तेमध्ये (FCAs) झालेली घट. जी एकूण राखीव रकमेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. RBI डेटानुसार, मालमत्ता या आठवड्यात 49.7 कोटी डॉलरने घसरून 569.392 अब्ज डॉलर राहिली. डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेत यूरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-अमेरिकन चलनांचाही समावेश होतो.

Loading...
Advertisement

या कालावधीत, सोन्याच्या साठ्याचे मूल्य 36 कोटी डॉलरने कमी होऊन 39.044 अब्ज डॉलर राहिला आहे. आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधी (IMF) सह विशेष रेखांकन अधिकार पुनरावलोकनाधीन आठवड्यात 1.6 कोटी डॉलरने घसरून 19.098 अब्ज डॉलर राहिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील देशाचा चलन साठाही 50 लाख डॉलरने कमी होऊन 5.202 अब्ज डॉलर राहिला आहे.

Advertisement

… म्हणून देशाचा परकीय चलनसाठ्यात घट; जाणून घ्या, नेमके काय आहे कारण..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply