Take a fresh look at your lifestyle.

वाव.. फक्त एकदाच रिचार्ज करा, 6 महिने टेन्शनच नाही; पहा, कोणत्या कंपनीचा आहे ‘हा’ भन्नाट प्लान

मुंबई : अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहेत. रिचार्जच्या किमती वाढल्याने दूरसंचार सेवांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना महागाईच्या काळात मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्लानसाठी त्यांना आता आधीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहे. या कारणामुळे, बरेच ग्राहक इतर रिचार्ज प्लॅनचा पर्याय शोधत आहेत, ज्यामध्ये त्यांना कमी खर्चात अनेक फायदे मिळू शकतात.

Advertisement

जर तुम्ही असा प्लान शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत अनलिमिटेड कॉल, दीर्घ वैधतेसह इंटरनेटचा लाभ मिळेल. आज आम्ही बीएसएनएलच्या अशा खास प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील. BSNL च्या या रिचार्ज प्लानची ​​वैधता एकूण 180 दिवसांची आहे. चला जाणून घेऊया या खास रिचार्ज प्लानबद्दल..

Advertisement

बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानची किंमत 699 रुपये आहे. जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये हा प्लान रिचार्ज केला तर तुम्हाला यात एकूण 180 दिवसांची वैधता मिळेल. म्हणजेच एकूण 6 महिने तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय हा प्लान सुरू राहिल. प्लानमध्ये, तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 0.5Gb डेटा मर्यादा मिळेल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40 kbps होईल. अशा परिस्थितीत या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरता येणार आहे.

Advertisement

या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळत आहे. याशिवाय तुम्हाला दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळेल. BSNL चा हा रिचार्ज प्लान कमी किमतीत चांगले फायदे देणारा आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलबरोबरच तुम्हाला दीर्घकालीन वैधता देखील मिळत आहे.

Advertisement

दरम्यान, सरकारी प्रयत्नांमुळे भारतीय 4G आणि 5G तंत्रज्ञान विकसित झाले आहे. BSNL 4G पीओसी च्या अंतिम टप्प्यात आहे. 4G स्पेक्ट्रम घेण्यासाठी सरकारने BSNL ला निधी देखील दिला आहे. या सर्व निर्णयांमुळे बीएसएनएलला अत्यंत स्पर्धात्मक परिस्थितीत टिकून राहण्यास मदत झाली आहे. आता सरकारी BSNL ला 20 लाखाहून अधिक घरांना हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी मदत करत आहे. सध्याचे सरकार किफायतशीर दूरसंचार सेवा सर्वात गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचण्याासाठी पारदर्शकपणे काम करत आहे.

Advertisement

BSNL साठी केंद्र सरकारचा मेगा प्लान.. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घेतलेत ‘हे’ निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply