Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ वाहनांबाबत केंद्रीय मंत्री गडकरींनी केलीय मोठी घोषणा; पहा, प्रवासी सुरक्षेसाठी काय घेतलाय निर्णय

नवी दिल्ली : देशातील मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या वाहनांबाबत केंद्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी एका ट्विटमध्ये सांगितले, की आठ लोकांची वाहतूक करणाऱ्या मोटार वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या GSR अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे.

Advertisement

यामुळे प्रवाशांची सुरक्षितता निश्चित होणार आहे. वाहनाचा प्रकार आणि त्याची किंमत काहीही असो, त्याचा विचार सरकारने केलेला नाही. मंत्रालयाने 1 जुलै 2019 पासून ड्रायव्हर एअरबॅग्ज आणि या वर्षात 1 जानेवारीपासून समोरील प्रवासी एअरबॅग्ज लागू करणे आधी बंधनकारक केले आहे. चारचाकी वाहनांमध्ये मागच्या आणि पुढच्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे टक्कर होण्याचे प्रमाण कमी होईल. देशातील सर्व वाहनांना सुरक्षित बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच 6 एअरबॅगच्या नियमामुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक होईल.

Advertisement

एअरबॅगची संख्या वाढली तर चारचाकी मधील अतिरिक्त एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. त्याचबरोबर वाहनांच्या किंमती फक्त 8 ते 9 हजार रूपयांनी वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सध्याची एअर बॅग्सची मुळ किंमत 1800 रूपयांच्या दरम्यान आहे. त्याचे मॉडिफिकेशन करण्यासाठी साधारण 500 रुपयांचा खर्च येईल.

Loading...
Advertisement

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते, की प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खासगी वाहन उत्पादकांना सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग्ज ठेवण्यास सांगितले आहे. एअरबॅग्स अनिवार्यपणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. हे पाऊल ग्लोबल NCAP च्या ‘सेफर कार्स फॉर इंडिया’ मोहिमेला समर्थन देते आणि देशात सुरक्षित मोटरिंग धोरणास प्रोत्साहन देते. खरे तर, अनेक विकसित बाजारपेठांमध्ये साइड एअरबॅग अनिवार्य फिटमेंट म्हणून उपलब्ध नाहीत परंतु क्रॅश चाचण्या आणि सुरक्षितता उपायांसाठी त्या आवश्यक ठरतात.

Advertisement

तीन वर्षात ‘त्यासाठी’ खर्च होणार तब्बल 7 लाख कोटी रुपये; केंद्रीय मंत्री गडकरींनी दिलीय माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply