Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘येथे’ सरकार नाही तर लोकांनीच केलाय चीनचा विरोध; पहा, चीनने काय दिलेय प्रत्युत्तर ?

दिल्ली : अलीकडच्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये चीनचा विरोध वाढला आहे. आता तर येथे लोकांनी चीनच्या विरोधात आंदोलनेही सुरू केली आहेत. काठमांडूतील चिनी दूतावासाचे प्रवक्त्यांनी नेपाळमधील चीनच्या उपस्थिती विरोधात नुकत्याच झालेल्या निदर्शनांबाबत एक निवेदन जारी केले आहे. चीन नेपाळला बेल्ट अँड रोड प्रकल्पातील महत्त्वाचा भागीदार मानतो आणि नेपाळच्या मदतीसाठी कोणत्याही राजकीय अटी ठेवत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

प्रवक्त्याने सांगितले की, चीन आणि नेपाळ हे पारंपारिक शेजारी आहेत. चीन नेपाळच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करतो आणि एकमेकांच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप न करण्याच्या आधारावर द्विपक्षीय मैत्रीपूर्ण वातावरण विकसित करतो. चीनच्या वाढत्या प्रभावाबाबत नेपाळमध्ये निदर्शने सुरू आहेत. चीनचा हस्तक्षेप थांबवा, सीमेवरील अतिक्रमण थांबवा आणि चीनमध्ये शिकणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करा अशा घोषणा देत आंदोलक चीनचा निषेध करत आहेत.

Advertisement

चीनने म्हटले आहे की, दोन्ही देशांनी 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला कोणताही वाद होऊ न देता सीमाप्रश्नावर तोडगा काढला होता आणि आता कोणताही वाद नाही. दोन्ही देशांचे परराष्ट्र अधिकारी बॉर्डर संबंधित मुद्द्यांवर संवाद साधतात. वैयक्तिक खोट्या अहवालांमुळे लोकांची दिशाभूल होणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे. नेपाळवर टाकलेल्या नाकेबंदीबाबत, प्रवक्त्याने सांगितले की, चिनी बाजूने नेपाळमध्ये मोठ्या अडचणीने एकेरी मालवाहतूक सुरू केली आहे आणि बंदरांची मालवाहतूक क्षमतेत सतत वाढ करण्यात आली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, चीन बरोबर व्यापारातही नेपाळला नुकसान सहन करावे लागत आहे. नेपाळ एअरलाइन्सने चीनमध्ये बनवलेली सहा विमाने वापरणे बंद केले आहे कारण कंपनी ती चालवू शकत नव्हती. निकृष्ट दर्जाच्या वस्तू बनवणारा देश म्हणून चीनची ओळख आहे आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही खूप जास्त आहे. नेपाळ एअरलाइन्सने अनेकदा सांगितले आहे, की 2014 ते 2018 दरम्यान खरेदी केलेल्या चीन-निर्मित विमानांमुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे आणि त्यामुळे ही विमाने ऑपरेशनमधून काढून टाकून आणखी तोटा टाळायचा आहे. 2020 मध्ये, नेपाळ एअरलाइन्सच्या बोर्ड सदस्यांनी निर्णय घेतला होता की ते यापुढे सहा वर्षांपूर्वी नेपाळला मिळालेली चिनी बनावटीची विमाने चालवणार नाहीत.

Advertisement

बाब्बो… पेट्रोल आणायला लोकं चाललेत की नेपाळला; पहा, कुठे घडतोय ‘हा’ चमत्कारिक प्रकार

Advertisement
Advertisement

Leave a Reply