Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. एकाच वर्षात आलेत ‘इतके’ मोबाइल अॅप; लोकांचा स्मार्टफोनचा वेळही वाढला; जाणून घ्या, आश्चर्यकारक माहिती

मुंबई : जगभरात स्मार्टफोनचा वापर अतिशय वेगाने वाढत आहे. दररोज हजारो नवीन मोबाइल अॅप लाँच होत आहेत. तसेच मोबाइल कंपन्याही नवनवीन फोन लाँच करत असतात. कोरोनाच्या काळात स्मार्टफोनवरील वेळेत लक्षणीय वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, 2021 मध्ये, भारतीय लोकांनी दररोज सुमारे 4.7 तास स्मार्टफोनसाठी दिले आहेत. ही आकडेवारी रिसर्च फर्म ‘App Annie’ ने जाहीर केली आहे.

Advertisement

या अहवालात म्हटले आहे, की 2021 मध्ये लोकांनी फोनवर सर्वाधिक वेळ व्यतीत केला आहे. जगातील 10 सर्वात मोठ्या स्मार्टफोन मार्केटमध्ये, लोक दररोज सरासरी 4.8 तास फोनसाठी देतात. संपूर्ण जगात, लोकांनी गेल्या वर्षी फोनवर सुमारे 3.8 ट्रिलियन किंवा 3,80,000 कोटी तास व्यतीत केले. अहवालात असे म्हटले आहे, की 2021 मध्ये 20 दशलक्षाहून अधिक मोबाइल अॅप लाँच करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्वात जास्त गेम अॅप आहेत. गुगल प्ले स्टोअरवर सुमारे 77 टक्के अॅप प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी 15 टक्के गेम्स अॅप आहेत.

Advertisement

फोनवर सर्वाधिक वेळ व्यतीत करण्याच्या बाबतीत भारतीयही मागे नाहीत. 2021 मध्ये भारतीयांनी दररोज सरासरी 4.7 तास दिले आहेत. जे 2019 च्या तुलनेत 1 तास जास्त आहे. 2019 मध्ये ही वेळ 3.7 तास होती. ब्राजील, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियामध्ये ही वेळ 5 तासांची आहे. 2021 मध्ये, 230 अब्ज किंवा 23 हजार मोबाइल अॅप डाऊनलोड केले गेले आहेत, जे दरवर्षी 5 टक्के वाढ दर्शवते. एका अंदाजानुसार, 2021 मध्ये प्रत्येक मिनिटाला 4 लाख 35 हजार अॅप डाउनलोड केले गेले आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, आता जगभरात कोरोनाच्या काळात स्मार्टफोन, लॅपटॉप या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे इंटरनेटचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  अशा परिस्थितीत रोज नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप मार्केटमध्ये येत आहेत. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनना तुफान प्रतिसाद मिळत आहे. नवीन फोन आला की काहीच वेळात  कोट्यावधींचे फोन विकले जातात, असा कंपन्यांचा अनुभव आहे.

Advertisement

सावधान..! स्मार्टफोनचा अतिवापर ठरतोय धोकादायक; ‘त्या’ अहवालाने केलाय धक्कादायक खुलासा

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply