Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. घ्या.. आता इलेक्ट्रिक कंपन्यांही देणार डोकेदुखी..! पहा, ‘त्या’ कंपनीने काय घेतलाय निर्णय

मुंबई : देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी एथर एनर्जीने ग्राहकांना नव्या वर्षात झटका दिला आहे. कंपनीने आपल्या Ather 450x आणि Ather 450 Plus इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत वाढ केली आहेत. कंपनीने या स्कूटरची किंमत जवळपास 5 हजार 500 रुपयांनी वाढ केली आहे. विशेष म्हणजे, या स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 80 किमीपर्यंतच्या रेंजसह येतात. Ola S1, Ola S1 Pro, बजाज चेतक आणि TVS i-Qube सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरबरोबर थेट स्पर्धा करतात.

Advertisement

वास्तविक, कंपनीने Ather Dot Portable Charger ची किंमत बदलली आहे. आता या चार्जरची किंमत 5 हजार 475 रुपये करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम दोन्ही स्कूटरच्या एक्स-शोरूम किमतीवर होतो. Ather 450 Plus आणि Ather 450x ची किंमत मुंबईत अनुक्रमे 1.09 लाख आणि 1.29 लाख रुपये आहे. त्याच वेळी, बंगलोरमध्ये, Ather 450x स्कूटर 1.51 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

Advertisement

दोन्ही Ather 450 Plus आणि Ather 450x इलेक्ट्रिक स्कूटर बर्‍याच प्रमाणात समान आहेत. जरी कार्यक्षमतेत फरक आहे. Ather 450 Plus स्कूटरमध्ये 5.4kW मोटर आणि 2.9kWh बॅटरी आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 80kmph आहे आणि ती 3.9 सेकंदात 40Kmph गाठू शकते. पूर्ण चार्ज केल्यावर स्कूटर 75 किमी पर्यंत रेंज देते. यात स्पोर्ट्स, राइड आणि इको असे तीन मोड आहेत.

Loading...
Advertisement

त्याच वेळी, Ather 450x तर त्यात 6kW मोटर आणि 2.9kWh बॅटरी आहे. यात इको, राइड, स्पोर्ट आणि वार्प असे चार राइड मोड आहेत. वार्प मोडमध्ये, ही स्कूटर 3.3 सेकंदात 0 ते 40kmph चा वेग गाठते आणि टॉप स्पीड 80 kmph आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ते 80 किमी पर्यंतची रेंज देते. दोन्ही स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास 45 मिनिटे लागतात.

Advertisement

इलेक्ट्रिक दुचाकींचा दबदबा..! मागील वर्षात केलीय दमदार कामगिरी; एकाच वर्षात रेकॉर्ड ब्रेक विक्री

Advertisement
Advertisement

Leave a Reply