Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारताचा मास्टरस्ट्रोक..! चीनच्या आधीच ‘त्या’ संकटग्रस्त देशाची केलीय मोठी मदत; जाणून घ्या, डिटेल..

दिल्ली : जगातील अनेक देश चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत. चीनचे कर्ज परत बहुतांश देशांना शक्य नाही. या यादीत श्रीलंकेचाही समावेश आहे. चीनचे अब्जावधींचे कर्ज परत करण्यात या लहान देशाच्या आवाक्याबाहेर ठरले आहे. चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या श्रीलंकेने कर्जाच्या पुनर्रचनेसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे आवाहन केले होते. श्रीलंकेने चीनकडून खूप जास्त व्याजदराने कर्ज घेतले आहे आणि आता हे कर्ज श्रीलंकेसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहे. श्रीलंकेला या वर्षी चीनला दीड ते दोन अब्ज डॉलर्स परत करावे लागणार आहेत.

Advertisement

या संकटाच्या काळात भारतानच श्रीलंकेला आधार देण्याचे काम केले आहे. होय, श्रीलंकेच्या संकटाच्या काळात भारत या देशाला तब्बल 6 हजार 670 कोटी रुपयांची मदत करणार आहे. भारताने तसे जाहीरही केले आहे. यामध्ये 2965 कोटींच्या चलनाची अदलाबदल आणि 3705 कोटींचे स्थगित पेमेंट समाविष्ट आहे. भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांनी श्रीलंकेच्या सेंट्रल बँक अजित निवार्ड काब्राल यांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट केले आहे, की या 6670 कोटी रुपयांमध्ये 3705 कोटी रुपयांच्या एशियन क्लियरिंग युनियन करार स्थगित करणे आणि 2965 कोटी रुपयांच्या चलन अदलाबदलीचा समावेश आहे. श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी डिसेंबर 2021 मध्ये आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला मदत करण्याचे आवाहन केले होते. श्रीलंकेला कोट्यवधींचे कर्ज मिटवायचे असल्याने श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे. या कारणामुळे श्रीलंका नव्या कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतो.

Loading...
Advertisement

श्रीलंकेनेही चीनकडून अनेक कोटींचे कर्ज घेतले असून चीनला मदतीचे आवाहनही केले आहे. गेल्या आठवड्यात चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या कोलंबो दौऱ्या दरम्यान श्रीलंकेनेही चीनला मदतीची विनंती केली होती, असे स्थानिक मीडिया अहवालात म्हटले आहे.

Advertisement

बाब्बो.. आधी चीनच्या कर्जाच्या जाळ्यात फसला, आता चीनकडेच मागतोय मदत; पहा, कोणत्या देशावर आलीय ‘ही’ वेळ

Advertisement
Advertisement

Leave a Reply