Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर..! येतोय नव्या वर्षातला पहिला IPO; पहा, काय आहे कंपनीचे नियोजन

मुंबई : नवीन वर्षात इनिशियल पब्लिक ऑफरची (IPO) वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे. वास्तविक, AGS Transact Technology कंपनीचा IPO लाँच होणार आहे. 2022 चा हा पहिला IPO ठरणार आहे.

Advertisement

AGS Transact टेक्नॉलॉजीचा IPO 19 जानेवारीला सुरू होईल आणि 21 जानेवारीला बंद होईल. कंपनीने IPO साठी 166-175 चा प्राइस बँड निश्चित केला आहे. जर आपण लॉटचा विचार केला तर त्याचे 85 शेअर्स आहेत. याचा अर्थ एका लॉटच्या IPO साठी 14,875 रुपये खर्च करावे लागतील. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार 1,93,375 रुपये खर्च करून 13 लॉट किंवा 1,105 समभागांसाठी अर्ज करू शकतात.

Advertisement

रवी गोयल आणि विनेहा एंटरप्रायझेस हे AGS Transact टेक्नॉलॉजीचे प्रवर्तक आहेत. या दोघांची मिळून कंपनीत 97.61 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय, एजीएसटीटीएल कर्मचारी कल्याण ट्रस्टची हिस्सेदारी 1.51 टक्के आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एचडीएफसी बँक आणि जेएम फायनान्शियल या आयपीओसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत. एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी एटीएम आणि सीआरएम आउटसोर्सिंग, कॅश मॅनेजमेंट आणि मर्चंट सोल्यूशन्स आणि मोबाइल वॉलेटसह डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स आदी सेवा प्रदान करते.

Loading...
Advertisement

देशात सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. कोरोना काळातही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून पाहता पाहता कोट्यावधींचा निधी गोळा करत आहेत. गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा मिळत आहे. आता पुढच्या वर्षात सुद्धा शेअर बाजारात आयपीओंचा पाऊस पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल 45 कंपन्यांचे आयपीओ येणार असल्याची माहिती आहे. या कंपन्यांनी तयारीही सुरू केली आहे. यामध्ये एलआयसी या सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे नव्या वर्षात गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

वाव.. ‘या’ कंपनीचा 500 कोटींचा IPO येतोय.. ‘सेबी’ ने दिलीय मंजुरी, जाणून घ्या, डिटेल

Advertisement
Advertisement

Leave a Reply