Take a fresh look at your lifestyle.

आजही सोने-चांदीच्या दरात तेजी कायम..! जाणून घ्या, राज्यातील मोठ्या शहरांतील भाव..

मुंबई : मागील तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही शुक्रवारी पहिल्या टप्प्यात सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याच्या दरात 0.26 टक्के तर चांदीच्या दरात 0.7 टक्क्यांनी वाढले आहेत.

Advertisement

आज फेब्रुवारीतील सोन्याचे वायदे दर 0.26 टक्क्यांनी वाढून 47,860 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 61,962 रुपये प्रति किलो असे दर आहेत. आज राज्यात मुंबई शहरात 24 कॅरेट सोने 49 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर आहेत. तसेच पुणे शहरात 48 हजार 850 रुपये, नाशिकमध्ये 48 हजार 850 रुपये आणि नागपूर शहरात 49 हजार 110 रुपये असे नवीन दर आहेत.

Advertisement

स्वस्त सोने खरेदीसाठी आज शेवटचा दिवस
दरम्यान, केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेचा नववा टप्पा सध्या सुरू आहे. तुम्हाला 14 जानेवारीपर्यंत खरेदी करण्याची संधी मिळेल. रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने या योजनेची किंमत 4,786 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. केंद्र सरकारने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना किमतीपेक्षा 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

अर्जाचे पेमेंट डिजिटल पद्धतीने केले जाते. सार्वभौम गोल्ड बाँड्स इश्यू किमतीवर वार्षिक 2.50% निश्चित व्याज दर देतात. ही रक्कम दर सहा महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होते. या योजनेत स्लॅबनुसार कर भरावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. बाँड 1 ग्रॅमच्या मूळ युनिटसह सोन्याच्या ग्रॅमच्या पटीत डिनोमिनेटेड केले जातात.

Advertisement

आज सोने-चांदीचा ट्रेंड बदलला..! दुसऱ्या दिवशी दरात वाढ; सोने खरेदीआधी जाणून घ्या भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply