वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी..! आणखी खर्च करण्यास राहा तयार; पहा, काय आहे कंपन्यांचा विचार ?
मुंबई : आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या भरमसाठ वाढलेल्या किंमतीनी हैराण झालेल्या वाहनधारकांना महागाईचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याच्या हप्त्यात वाढ करण्याची पूर्ण तयारी केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा कंपन्यांचा विचार आहे. विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे (IRDAI) पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी मिळावी अशी मागणी केली आहे. कंपन्यांची मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील करोडो वाहनधारकांवर होणार आहे.
Zeebiz च्या अहवालानुसार, भारतात सुमारे 25 सामान्य विमा कंपन्या आहेत. त्यांच्या प्रस्तावाला IRDA मंजुरी देईल, असे कंपन्यांना अपेक्षित आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे, की त्यांना कोरोनामुळे खूप त्रास होत आहे. हे पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्सचा सध्याचा प्रीमियम चांगला नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. काही कंपन्यांची परिस्थिती अशी झाली आहे की त्यांची करदान क्मता त्यांच्या ठराविक मर्यादेच्या खाली गेली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दावेही वाढले आहेत.
त्यामुळे कंपन्यांवरील दबावही वाढला आहे. 2018 च्या निर्णयानंतर, नवीन दुचाकी खरेदी करताना चारचाकी वाहनांसाठी 5 वर्षांचा तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी इन्शुरन्स) आणि 3 वर्षांचा तृतीय पक्ष विमा घेणे बंधनकारक आहे. दरम्यान, आता विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कंपन्यांच्या या प्रस्तावास मंजुरी देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विशेषत: आर्थिक परिस्थितीत विमा हा एक मजबूत आधार आहे. विमा आपल्या कुटुंबाला भविष्यात कोणत्याही संकटास तोंड देण्याचे सामर्थ्य देत असताना, बचतीचा मोठा आधार देखील आहे. बरेच लोक फक्त बचतीसाठी विमा पॉलिसी घेतात. मात्र येथे आपण हे समजून घेतले पाहिजे की गुंतवणूक आणि विमा या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. गुंतवणुकीसाठी विमा उतरवून, तुम्हाला अपेक्षित परतावा मिळत नाही. विमा बाजारही विस्तारला आहे. आज प्रत्येक गोष्टीचा विमा उतरवला जात आहे.
कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी : कार विमा हप्ता ‘असा’ होईल कमी; जाणून घ्या, काही सोप्या टिप्स