Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेअर टिप्सचा बाजार मांडणाऱ्यांचा उठला बाजार; २.८४ कोटी रुपये करावे लागणार परत

मुंबई : सध्या शेअर बाजारातील फुगा फुगवण्यासाठी आणि त्याद्वारे नव्या गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी काही गुजराती आणि मारवाडी यांच्यासह मराठी महाभाग तेजीत आहेत. अनेकांनी त्यांच्या नादी लागून बोगस शेअरमध्ये मोठा पैसा ओतला आहे. परिणामी भविष्यात अनेकांना याद्वारे मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. असाच फसवणूक प्रयत्न करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

Advertisement

सेबी अर्थात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड या बाजार नियामकाने ही कारवाई केली आहे. टेलिग्राम आणि व्हाॅट्सअॅप ग्रुपद्वारे शेअरच्या किमती वाढवण्यासाठी स्टाॅक-टिप्स दिल्याचे हे प्रकरण आहे. सेबीने सोशल मीडिया समूहांद्वारे शेअरच्या शिफारशी करून फसवणूक आणि अनुचित व्यापार पद्धतीत सहभागी असलेल्या हिमांशू महेंद्रभाई पटेल, राज महेंद्रभाई पटेल, जयदेव जाला, महेंद्रभाई बेचारदास पटेल, कोकिलाबेन महेंद्रभाई पटेल आणि अवनीबेन किरणकुमार पटेल यांच्यावर बंदी घातली आहे. सेबीने त्यांनी या अनुचित प्रकारे मिळवलेले २.८४ कोटी रुपये परत करण्यासही सांगितले आहे. ही वसुली पुढील काळात होणार आहे. यामुळे अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्यांचा काहीअंशी का होईना बाजार उठणार आहे.

Loading...
Advertisement

‘बुलरन २०१७’ या टेलिग्राम चॅनलसमवेत जवळपास ५२,००० लोक जोडलेले होते. प्राथमिकदृष्ट्या त्याचे संचालन हिमांशू, राज आणि जयदेव करून लहान कंपन्यांच्या शेअरबाबत सल्ला देत होते. त्यांची कोणतीही नोंदणीही नाही. याबाबतच्या तक्रारी सेबीला मिळाल्या होत्या. त्यानंतर २०२१ मध्ये सेबीने त्याची चौकशी सुरू केली. सेबीच्या चौकशीत ‘बुलरन २०१७’ हे टेलिग्राम चॅनल, ‘बुलरन इन्व्हेस्टमेंट एज्युकेशनल चॅनल’ आणि ‘स्टाॅक गुजराती ३’ या व्हाॅट्सअॅप ग्रुपची माहिती मिळाली. त्यांचे जवळपास ५०,००० ग्राहक होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply