भारीच.. संयुक्त राष्ट्रसंघानेही केलेय भारताचे कौतुक; अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज; जाणून घ्या..
मुंबई : संयुक्त राष्ट्रांनी भारताच्या कोरोना लसीकरण मोहिमेचे कौतुक केले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेमुळेच देशाची अर्थव्यवस्था आता मजबूत मार्गावर आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. यासह, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, भारताचा आर्थिक विकास अचानक थांबवण्याचा इशाराही दिला आहे. कोळशाची टंचाई आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आगामी काळात भारताच्या आर्थिक घडामोडींमध्ये अडचणी येऊ शकतात, असे संयुक्त राष्ट्रांच्या वतीने सांगण्यात आले.
जगभरात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. आता ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आला आहे. या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. अमेरिकेसह युरोपीय देश पुन्हा हैराण झाले आहेत. त्यामुळे या देशांनी निर्बंध कठोर केले आहेत. अशा परिस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेबाबत मात्र दिलासादायक बातमी आली आहे. पुढील वर्षात अर्थव्यवस्थेत आशियाई देशांचा दबदबा राहणार असून अमेरिका, ब्रिटेन सारख्या विकसित देशांनाही हे देश मागे टाकतील असा अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता.
सन 2022 मध्ये जागतिक आर्थिक उत्पादन 100 ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल. यावेळी भारत फ्रान्सला मागे टाकत सहावा क्रमांक मिळवेल. यानंतर भारत 2023 मध्ये ब्रिटनला मागे टाकेल आणि 2031 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (CEBR) च्या अहवालात हा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्रांनीही आगामी काळात भारताचा विकास दर वाढणार असल्याचे म्हटले आहे.
सीईबीआरच्या अहवालात असेही म्हटले होते, की अमेरिकेला मागे टाकण्यासाठी चीनला पूर्वीच्या अंदाजापेक्षा दोन वर्षे जास्त लागतील. 2028 पर्यंत चीन अमेरिकेला मागे टाकून जगातील नंबर 1 अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. आता यामध्ये 2030 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सन 2033 मध्ये आर्थिक उत्पादनात जर्मनी जपानला मागे टाकेल. इंडोनेशिया 2034 पर्यंत 9 व्या क्रमांकावर जाऊ शकतो आणि सन 2036 पर्यंत रशिया पहिल्या 10 अर्थव्यवस्थांमध्ये असेल.
ब्रिटेल-फ्रान्सला भारत देणार धक्का, चीनही अमेरिकेला मागे टाकणार; पहा, कुणी केलाय ‘हा’ दावा