Take a fresh look at your lifestyle.

वाव.. या कंपनीच्या कारची जबरदस्त क्रेझ; वर्षभरात केलाय ‘असा’ अनोखा कारनामा; जाणून घ्या..

मुंबई : जर्मन कार ब्रँड BMW ने 2021 मध्ये जगभरात 2,213,795 युनिट्सची विक्री करून एका वर्षात सर्वाधिक कार विक्रीचा दावा केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, एका वर्षातील कार विक्रीचा हा सर्वाधिक आकडा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 9.1 टक्के विक्री वाढ नोंदवली आहे. यासह BMW, लॅम्बोर्गिनी, रोल्स-रॉइस आणि बेंटले सारख्या इतर कंपन्यांच्या यादीत सहभागी झाली आहे, ज्यांनी 2021 मध्ये त्यांची सर्वोत्तम वार्षिक कार विक्री केली आहे. BMW ने असा दावा केला आहे, की त्यांनी गेल्या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत एकूण 5,10,727 वाहनांची विक्री केली आहे.

Advertisement

कंपनीचा दावा आहे की 2021 मध्ये जगभरात BMW कारच्या एकूण 1,63,542 युनिट्सची विक्री केली. 2020 च्या विक्रीच्या कामगिरीच्या तुलनेत 13.4 टक्के जास्त आहे. BMW M3 आणि M4 हे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल होते. याशिवाय X5 M आणि X6 M ला देखील जास्त मागणी दिसून आली. याशिवाय, M परफॉर्मन्स विभागातील इतर कारमध्ये, iX M60 आणि i4 M50 ला चांगली मागणी आहे.

Advertisement

अमेरिकेतील मोठया बाजारपेठेत बीएमडब्ल्यूने कारच्या विक्रीत मोठी झेप घेतली आहे. ऑटोमेकरने गेल्या वर्षात 3,36,644 युनिट्सची विक्री करून 20.8 टक्के वाढ नोंदवली. हे अमेरिकी मार्केटमध्ये बीएमडब्ल्यूच्या कोरोना आधीच्या विक्रीशी तुलना करता येईल. गेल्या वर्षात अमेरिकी मार्केटमध्ये ब्रँडच्या विक्रीत BMW चा वाटा 60 टक्के होता. युरोपियन बाजारपेठेत, BMW आणि Mini या दोघांनी मिळून 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये वार्षिक विक्रीत 3.9 टक्के वाढ नोंदवली. बीएमडब्ल्यूने नोंदवले की युरोपियन बाजारपेठेतील सर्वात मोठी विक्री बेल्जियममध्ये झाली आहे.

Advertisement

विक्रीबद्दल माहिती देताना BMW AG चे बोर्ड सदस्य पीटर नोटा म्हणाले, की पुरवठ्यातील अडचणी आणि कोरोना व्हायरस असूनही, BMW ने 2021 मध्ये मजबूत विक्री कामगिरी केली आहे. BMW ब्रँडच्या नेतृत्वाखाली, जो जागतिक प्रीमियम विभागात प्रथम क्रमांकावर आहे, आमच्या ब्रँडने जगभरात सर्वोत्तम विक्री परिणाम दिले आहेत.

Advertisement

अर्र.. वर्ष अखेरीस वाहन कंपन्यांना दणका.. ‘त्यामुळे’ वाहनांच्या विक्रीत मोठी घट; जाणून घ्या कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply