Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जागतिक बँकेने पाकिस्तान बाबत व्यक्त केलाय मोठा अंदाज; पहा, नेमके काय म्हटलेय अहवालात

नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या अनेक संकटांतून जात आहे. कोरोनाचे संकट तर आहेच त्यात आता महागाईने हाहाकार उडाला आहे. विदेशी कर्ज प्रचंड वाढले आहे. कर्ज परत करण्यासाठी आणखी कर्ज घ्यावे लागत आहे. आता तर सरकारने लोकांना त्रास देणारे निर्णय घेतले आहे. महसूल मिळत नाही म्हणून इंधनासह अन्य आवश्यक वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. अर्थव्यवस्था तर पूर्ण डबघाईस आली आहे. अशा अनेक संकटात सापडलेल्या या देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्वाची बातमी मिळाली आहे.

Advertisement

चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानचा आर्थिक विकास दर 3.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. संरचनात्मक सुधारणा आणि वाढलेली निर्यात स्पर्धात्मकता यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणे अपेक्षित आहे. जागतिक बँकेने बुधवारी आपल्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट 2022 मध्ये म्हटले आहे, की रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेने गेल्या वर्षात वाढ नोंदवली आहे. सुधारित देशांतर्गत मागणी, उदार आर्थिक धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून आली.

Advertisement

डॉन वृत्तपत्राने जागतिक बँकेच्या हवाल्याने म्हटले आहे, की चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची अर्थव्यवस्था 3.4 टक्के दराने वाढेल. 2022-23 या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 4 टक्के राहण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे, की पाकिस्तानमधील वास्तविक व्याजदर 2020 मध्ये वेगाने कमी झाले आणि 2021 पर्यंत नकारात्मक राहिले. याशिवाय, मजबूत देशांतर्गत मागणी आणि वाढत्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्यामुळे देशाची वस्तू व्यापार तूट वाढली.

Loading...
Advertisement

दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोना काळात महागाईने हाहाकार उडाला आहे. महागाई कमी करण्याऐवजी येथील सरकार मात्र त्यात आणखी वाढ करत आहे. आताही सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांना जोरदार झटका दिला होता. देशात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारने हा नवा आदेश नुकताच जारी केला आहे.

Advertisement

पाकिस्तानमध्ये आता मोबाइल, कॉम्प्युटरसह अनेक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. यासाठी सरकारने मिनी बजेट तयार केले आहे. या विधेयकासही विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. मात्र, सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तसे पाहिले तर देशाची अर्थव्यवस्था सध्या अतिशय खराब स्थितीत आहे.

Advertisement

अरे वा.. भारत ‘तिथे’ ही बनलाय आधिक सामर्थ्यवान; पहा, कुठे आहेत पाकिस्तान-अफगाणिस्तान ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply