Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. मोठेच संकट म्हणायचे..! म्हणून तेथील 50 टक्के कारखान्यांना टाळे; पहा, काय आहे कारण..?

नवी दिल्ली: अफगाणिस्तान मधील संकटात सातत्याने वाढ होत आहे. तालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आणि तालिबानने अंतरिम सरकार स्थापन केले. मात्र हे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर अफगाणिस्तानची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानमधील आर्थिक संकटामुळे देशातील 50 टक्के कारखाने बंद पडले आहेत आणि या कारखान्यांमधील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे एकीकडे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेचे संकट गडद होऊ लागले आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तानातील नागरिक मोठ्या संख्येने बेरोजगार झाले आहेत. या कारणांमुळे अफगाणिस्तान उपासमारीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.

Advertisement

अफगाणिस्तानच्या प्रतिष्ठित टोलो न्यूजने अफगाणिस्तानमधील आर्थिक संकटामुळे देशातील 50 टक्के कारखाने बंद झाल्याचा अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये टोलो न्यूजने दावा केला आहे, की कारखाने बंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे बँकिंग समस्या आणि वीज टंचाई. बँकिंग समस्या, वीज संकटामुळे देशातील 40 ते 50 टक्के कारखाने बंद पडले आहेत.

Advertisement

वास्तविक, अफगाणिस्तान आपल्या विजेच्या मागणीसाठी मध्य आशियाई देशांवर पूर्णपणे अवलंबून आहे. अलीकडेच उजबेकिस्तानने अफगाणिस्तानची वीज तोडली. त्यामुळे देशातील अनेक शहरे अंधारात बुडाली. या दरम्यान थकबाकी न भरल्याने उजबेकिस्तानने वीज तोडल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानने याला तांत्रिक कारण म्हटले असले तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार उजबेकिस्तानने अफगाणिस्तानचा वीज पुरवठा बंद केला आहे.

Loading...
Advertisement

मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे, की अफगाणिस्तानचे तालिबान सरकार आपला पहिला अर्थसंकल्प आणणार आहे. यासंदर्भात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. वास्तविक संकटाचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानला तालिबान सरकारच्या पहिल्या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Advertisement

कंगाल तालिबानच्या धमक्या सुरुच..! आता ‘त्या’ मुद्द्यावर देशांना धमकावले.. पहा, काय सुरू आहे तालिबानी राज्यात

Advertisement
Advertisement

Leave a Reply