Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तर पेट्रोल होणार रु. 150/लिटर..! पहा नेमकी कशामुळे ओढवली अशी परिस्थिती

मुंबई : सध्या भारतात निवडणुकीचा हंगाम तेजीत असल्याने पेट्रोल आणि डीझेल दरवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र, निवडणुका संपल्यावर आणखी किती दरवाढ होणार याबाबत चर्चा चालू आहे. अशावेळी भारताच्या शेजारील पाकिस्तान या देशात अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने पेट्रोल दरवाढीची चर्चा सुरू आहे. गरिबीशी झगडणारा पाकिस्तान लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणार असल्याच्या बातम्या आहेत. 16 जानेवारीपासून पाकिस्तानमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत 150 रुपयांवर पोहोचणार आहे. दुसरीकडे इम्रान खान धर्माचा हवाला देऊन जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत. अलीकडे इम्रान सरकारनेही अनेक वस्तूंवरील करात प्रचंड वाढ केली आहे. तिजोरी भरण्यासाठी कर वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे खुद्द पंतप्रधान इम्रान यांचे मत आहे.

Advertisement

जिओ टीव्हीच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा हवाला देत किंमती वाढवल्याचं म्हटलं आहे. पेट्रोलचे दर लवकरच सर्वकालीन उच्चांक गाठणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 150 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचू शकते. वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इम्रान सरकार पेट्रोलियम पदार्थांच्या किमती प्रति लिटर 6 रुपयांनी वाढवू शकते. याशिवाय पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 6 रुपयांनी वाढ होणार आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर पाकिस्तानचे अर्थ मंत्रालय याबाबत अंतिम निर्णय घेईल. पेट्रोल आणि डिझेलच्या या नवीन किमती 16 जानेवारीपासून लागू होणार आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ नवीन वर्षाच्या शेवटच्या दिवशी करण्यात आली होती. 31 डिसेंबर रोजी, 15 दिवसांसाठी पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेल (एचएसडी) च्या किंमतीत प्रति लिटर 4 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. रॉकेलच्या किमतीत 3.95 रुपयांनी आणि लाइट डिझेल ऑइलच्या (एलडीओ) किमतीत 4.15 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Loading...
Advertisement

Advertisement

Leave a Reply