Take a fresh look at your lifestyle.

आजही सोन्या-चांदीच्या दरात तेजी.. जाणून घ्या, राज्यातील मोठ्या शहरातील नवीन भाव..

मुंबई : मागील दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे. आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. त्याच वेळी, चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात केवळ 119 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्याचवेळी आज चांदीच्या दरात 745 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.

Advertisement

दिल्ली सोने मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 119 रुपयांनी वाढून 46,919 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. याआधी दिल्ली सोने मार्केटमध्ये सोने 46,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. चांदीचा भाव 745 रुपयांनी वाढून 60,777 रुपये प्रति किलोवर बंद झाला. याआधी चांदीचा भाव ६०,०३२ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

Advertisement

आज मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार 950 रुपये तर 22 कॅरेटसाठी 46 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर आहेत. पुणे शहरात 24 कॅरेटसाठी 48 हजार 640 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 46 हजार 130 रुपये, नाशिक शहरात 24 कॅरेटसाठी 48 हजार 640 रुपये तर 22 कॅरेटसाठी 46 हजार 130 रुपये आणि नागपूर शहरात 24 कॅरेटसाठी 48 हजार 950 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 46 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम असा भाव आहे.

Advertisement

स्वस्त सोने खरेदीसाठी उद्या शेवटचा दिवस
दरम्यान, केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेचा नववा टप्पा सध्या सुरू आहे. तुम्हाला 14 जानेवारीपर्यंत खरेदी करण्याची संधी मिळेल. रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने या योजनेची किंमत 4,786 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. केंद्र सरकारने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना किमतीपेक्षा 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

अर्जाचे पेमेंट डिजिटल पद्धतीने केले जाते. सार्वभौम गोल्ड बाँड्स इश्यू किमतीवर वार्षिक 2.50% निश्चित व्याज दर देतात. ही रक्कम दर सहा महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होते. या योजनेत स्लॅबनुसार कर भरावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. बाँड 1 ग्रॅमच्या मूळ युनिटसह सोन्याच्या ग्रॅमच्या पटीत डिनोमिनेटेड केले जातात.

Advertisement

आजही सोने-चांदी चमकले..! आज सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ; जाणून घ्या काय आहेत भाव ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply