वाव..फक्त 10 सेकंदात 116 कोटींचे फोन विकले..! ‘ओप्पो’, ‘विवो’ नाही तर ‘या’ फोनने केलीय कमाल
मुंबई : जगभरात तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनी कंपन्यांचा दबदबा आहे. स्मार्टफोन कंपन्यांत तर आजमितीस चीनने जगातील बहुतांश देशांचे मार्केट काबीज केले आहे. नवीन स्मार्टफोन आला की काही मिनिटात विक्री होते, असा अनुभव आहे. आताही असाच प्रकार घडला आहे. मोबाइल दुनियेत आघाडीवर असलेल्या iQOO या कंपनीचे नवीन स्मार्टफोन्स अवघ्या काही सेकंदात विक्री झाले आहेत. या फोनला जबरदस्त मागणी होती. त्यामुळे हे फोन काही सेकंदात विकले गेले आहेत.
कंपनीने अलीकडेच iQOO9 मालिका लाँच केली होती. ‘iQOO9’ आणि ‘iQOO9 Pro’ हे दोन स्मार्टफोन लाँच केले गेले. या फोनची पहिली विक्री सुरू झाली. चीनमध्ये पहिल्या सेलमध्ये या फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या 10 सेकंदात 100 मिलियन युआन म्हणजेच सुमारे 116.25 कोटी रुपये किंमतीचे फोन विकले गेले. विशेष म्हणजे, या फोनची सुरुवातीची किंमत तब्बल 58 हजार रुपये आहे. तरी देखील फोन हातोहात विकले गेले. अद्याप हे फोन भारतात आलेले नाहीत. देशात या फोनला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याआधी रियलमी कंपनीनेही चीनमध्ये असाच कारनामा केला होता. काही दिवसांपूर्वी Realme ने चीनमध्ये एक इव्हेंट आयोजित केला होता. यामध्ये नवीन स्मार्टफोन Realme GT2 आणि GT2 Pro लाँच केले होते. आज हे दोन्ही स्मार्टफोन्स पहिल्यांदाच चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून या सेलमध्ये फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. Gizmo चायना च्या अहवालानुसार, Realme GT2 स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीच्या डेटावरून असे दिसून येते की कंपनीने अवघ्या तीन मिनिटांत तब्बल 233 कोटी रुपयांचे फोन विकले.
‘जिओ’ ला मिळालीय जोरदार टक्कर..! ‘या’ कंपनीने लाँच केलाय स्वस्त स्मार्टफोन; जाणून घ्या फिचर्स