Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आधी केली भरमसाठ दरवाढ.. आता दरकपात केल्याचा दिखावा; पहा, किती कमी केलेत तेलाचे भाव..?

मुंबई : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे महागाईच्या संकटामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना दुसरीकडे कोरोनाने पुन्हा एकदा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. साबणापासून ते डिटर्जंटपर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून एलपीजीपर्यंत सर्व वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र, अशा परिस्थितीत खाद्यतेलांच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement

खाद्यतेलाच्या किमतींबाबत केंद्र सरकारने सांगितले, की देशभरातील खाद्यतेलाच्या किरकोळ किमती एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत जागतिक बाजाराच्या अनुषंगाने जास्त आहेत, परंतु ऑक्टोबर 2021 पासून त्यामध्ये घट दिसून येत आहे. 167 किंमत संकलन केंद्रांवरील आकडेवारीनुसार, देशभरातील प्रमुख किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किरकोळ किमती 5 ते 20 रुपये प्रति किलोच्या श्रेणीत कमी झाल्या आहेत.

Advertisement

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी शेंगदाणा तेलाची सरासरी किरकोळ किंमत 180 रुपये प्रति किलो, मोहरीचे तेल 184.59 रुपये प्रति किलो, सोया तेल 148.85 रुपये प्रति किलो, सूर्यफूल तेल 162.4 रुपये प्रति किलो आणि पाम तेल 128.5 रुपये प्रति किलो होते. 1 ऑक्टोबर 2021 च्या प्रचलित किंमतींच्या तुलनेत, शेंगदाणे आणि मोहरीच्या तेलाच्या किरकोळ किमती 1.50 ते 3 रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत, तर सोया आणि सूर्यफूल तेलाच्या किमती आता 7-8 प्रति किलोने कमी झाल्या आहेत.

Loading...
Advertisement

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अदानी विल्मरसह प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी प्रति लिटर 15 ते 20 रुपयांची कपात केली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी करणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, हैदराबाद, मोदी नॅचरल्स, दिल्ली, गोकुळ री-फॉइल अँड सॉल्व्हेंट, विजय सॉल्व्हेक, गोकुळ अॅग्रो रिसोर्सेस आणि एनके प्रोटीन्स यांचा समावेश आहे.

Advertisement

खाद्यतेलाच्या या घसरणीमागे दोन प्रमुख कारणे दिली जात आहेत. पहिले कारण म्हणजे सरकारने आयात शुल्कात कपात केली आहे. याशिवाय दुसरे कारण म्हणजे तेलाच्या साठ्यालाही आळा बसला आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे एकीकडे खाद्यतेलाचे किरकोळ दर कमी होत असतानाच दुसरीकडे तेलाच्या किमतीमुळे सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. देशात एकूण वापराच्या 55 ते 60 टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते.

Advertisement

आम आदमीला पुन्हा झटका..! महागाई वाढ रोखणे होतेय अशक्य.. पहा, किती वाढलाय महागाईचा दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply