मुंबई : सध्याच्या काळात तुम्ही जर पैशांची सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या अनेक योजना आहेत. पोस्टाच्या योजनांमध्ये जोखीम नेहमीच कमी असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, येथे पैसेही सुरक्षित असतात. तसेच आता पोस्टाच्या योजनांद्वारे चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळे पोस्टात पैसे गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना) या योजनेद्वारे तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला दररोज फक्त 417 रुपये जमा करावे लागतील. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असला, तरी तुम्ही तो 5-5 वर्षांसाठी दोनदा वाढवू शकता. याबरोबरच या प्लॅनमध्ये तुम्हाला कर लाभही मिळतो. या योजनेत तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते आणि त्यामुळे तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभही मिळतो.
जर तुम्ही 15 वर्षे म्हणजे मॅच्युरिटीपर्यंत गुंतवणूक केली आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक जमा केले, म्हणजे एका महिन्यात 12500 रुपये आणि एका दिवसात 417 रुपये. तर तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख होईल. योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 7.1 टक्के वार्षिक व्याजासह चक्रवाढीचा लाभ देखील मिळेल. यावेळी तुम्हाला तब्बल 18.18 लाख रुपये व्याज म्हणून मिळतील. म्हणजेच तुम्हाला एकूण 40.68 लाख रुपये मिळतील.
दुसरीकडे, जर तुम्हाला या योजनेतून लक्षाधीश व्हायचे असेल, तर तुम्ही या योजनेद्वारे तुमची गुंतवणूक 15 वर्षांनंतर 5-5 वेळा दोनदा वाढवू शकता. वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवल्यास, तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख रुपये होईल. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 7.1 टक्के व्याजदरासह 65.58 लाख रुपये मिळतील. म्हणजेच 25 वर्षांनंतर तुमचा एकूण निधी 1.03 कोटी होईल.
पगारदार, स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह कोणताही रहिवासी पोस्ट ऑफिसच्या पीपीएफमध्ये खाते उघडू शकतो. फक्त एक व्यक्ती हे खाते उघडू शकते. यामध्ये तुम्ही संयुक्त खाते सुरू करता येत नाही. अनिवासी भारतीयांना त्यात खाते उघडता येत नाही. जर रहिवासी भारतीय PPF खात्याच्या मॅच्युरिटीपूर्वी विदेशात स्थायिक झाला तर तो मॅच्युरिटी होईपर्यंत खाते चालू ठेवू शकतो.
एका आर्थिक वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेवण्याची परवानगी आहे. पोस्ट ऑफिस PPF मध्ये ठेवींची संख्या वार्षिक 12 पर्यंत मर्यादित आहे. PPF ही EEE (E-E-E) गुंतवणूक आहे म्हणजेच गुंतवलेली मूळ रक्कम, मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या सर्व करमुक्त आहेत. खाते चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली किमान वार्षिक गुंतवणूक 500 रुपये आहे. पोस्ट ऑफिस PPF खात्यावरील व्याज दरवर्षी चक्रवाढ होते आणि दरवर्षी 31 मार्च रोजी दिले जाते.
पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदाच करा गुंतवणूक; दर महिन्यास मिळेल उत्पन्नाची हमी; जाणून घ्या डिटेल..