Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आजही सोने-चांदी चमकले..! आज सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ; जाणून घ्या काय आहेत भाव ?

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या आहेत. राजधानी दिल्ली शहरात आज बुधवारी सोन्याच्या भावात 228 रुपयांनी वाढ नोंदविली गेली. प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,584 रुपयांवरुन 46,812 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव 271 रुपयांच्या वाढीसह प्रति किलो 59,932 रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भावात वाढ नोंदविली गेली. सोन्याला 1,818 प्रति औंस भाव मिळाला आणि चांदीचा भाव 22.70 प्रति औंसवर स्थिर राहिला.

Advertisement

दिल्ली शहरातील सोने मार्केटमध्ये बुधवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 228 रुपयांनी वाढून 46,812 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. याआधी सोने 46,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. चांदीचा भाव 271 रुपयांनी वाढून 59,932 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

Advertisement

देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरातही सोन्याचे भाव वाढल्याचे दिसून आले. 24 कॅरेट सोन्याचे भाव 350 रुपयांनी वाढले त्यामुळे सोन्याने पुन्हा एकदा 48 हजारांचा टप्पा पार केला. या नव्या दरवाढीमुळे सोन्याचे भाव 48 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम असे झाले. पुणे शहरात सुद्धा सोन्याचे भावात वाढ नोंदवण्यात आली. आज शहरात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 290 रुपये वाढ झाली. त्यामुळे आता सोन्याचे दर 48 हजार 630 रुपये असे आहेत.

Advertisement

नागपूरमध्ये सोन्याच्या भावात वाढ नोंदविली गेली. काल पेक्षा सोन्याचा भाव 350 रुपयांनी वाढला. प्रति तोळा सोन्याचा भाव 46,590 रुपयांवरुन 46,940 वर पोहोचला. नाशिकमध्ये सोन्याच्या भावात वाढ दिसून आली. काल पेक्षा सोन्याचा भाव 280 रुपयांनी वाढला. प्रति तोळा सोन्याचा भाव 45,840 रुपयांवरुन 46,120 वर पोहोचला.

Loading...
Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेचा नववा टप्पा सध्या सुरू आहे. तुम्हाला 14 जानेवारीपर्यंत खरेदी करण्याची संधी मिळेल. रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने या योजनेची किंमत 4,786 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. केंद्र सरकारने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना किमतीपेक्षा 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

अर्जाचे पेमेंट डिजिटल पद्धतीने केले जाते. सार्वभौम गोल्ड बाँड्स इश्यू किमतीवर वार्षिक 2.50% निश्चित व्याज दर देतात. ही रक्कम दर सहा महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होते. या योजनेत स्लॅबनुसार कर भरावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. बाँड 1 ग्रॅमच्या मूळ युनिटसह सोन्याच्या ग्रॅमच्या पटीत डिनोमिनेटेड केले जातात.

Advertisement

आज सोने-चांदीचा ट्रेंड बदलला..! दुसऱ्या दिवशी दरात वाढ; सोने खरेदीआधी जाणून घ्या भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply