Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आम आदमीला पुन्हा झटका..! महागाई वाढ रोखणे होतेय अशक्य.. पहा, किती वाढलाय महागाईचा दर

मुंबई : वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यांना सध्याच्या काळात कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. कारण, नव्या वर्षात अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. आणखीही दरवाढ होण्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. अशा परिस्थितीत आणखी एक काळजीत टाकणारी बातमी मिळाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईचा दर 5.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. खाद्य पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाई नोव्हेंबरमधील 4.91 टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये 5.59 टक्क्यांवर पोहोचली आहे.

Advertisement

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर 2021 मध्ये 4.91 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 4.59 टक्के होती. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई 4.05 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. जी आधीच्या महिन्यात 1.87 टक्‍क्‍यांवर होती.

Advertisement

आरबीआयकडून मुख्यत्वे द्वि-मासिक चलनविषयक आढाव्यात किरकोळ चलनवाढीचा डेटा लक्षात घेतला जातो. प्रतिकूल आधारभूत परिणामामुळे उर्वरित आर्थिक वर्षात महागाईचा वाढत राहील, असा बँकेचा अंदाज आहे. बँकेच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण महागाईचा दर सर्वाधिक पातळीवर असेल. त्यानंतर यामध्ये कपात होण्यास सुरुवात होईल.

Loading...
Advertisement

दुसरीकडे, औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) मध्ये वाढ झाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन 1.6 टक्क्यांनी घसरले. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्राचे उत्पादन गेल्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये 0.9 टक्क्यांनी वाढले आहे.

Advertisement

नोव्हेंबर 2021 मध्ये खाण उत्पादनात 5 टक्के वाढ झाली आहे आणि वीज निर्मितीमध्ये 2.1 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये, IIP 1.6 टक्क्यांनी घसरला होता. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान IIP 17.4 टक्क्यांनी वाढला. मागील वर्षात याच कालावधीत 15.3 टक्क्यांनी घसरला होता. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मार्च 2020 पासून देशाच्या औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी, लॉकडाऊननंतर जेव्हा आकडेवारी जाहीर झाली, तेव्हा त्यात 18.7 टक्क्यांची घट झाली. एप्रिल 2020 मध्ये, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडी पूर्णपणे बंद पडल्यामुळे 57.3 टक्के घट झाली होती.

Advertisement

महागाईच्या काळात खुशखबर..! घरखर्चाचे बजेट होणार आणखी हलके; राज्यांना मिळालेय महत्वाचे आदेश

Advertisement
Advertisement

Leave a Reply