Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. BSNL चा चौकार..! ‘जिओ’, ‘एअरटेल’ ला टक्कर देण्यासाठी आणलेत चार प्लान; जाणून घ्या डिटेल..

मुंबई : देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने अजूनही 4G नेटवर्क सुरू केलेले नाही. कंपनी लवकरच 4G नेटवर्क देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या एका कारणामुळे कंपनी अन्य खासगी कंपन्यांच्या तुलनेत मागे पडली आहे. मात्र, ही कमतरता दूर करण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएलनेही काही खास प्लान लाँच केले आहेत. आताही कंपनीने असेच चार प्लान सादर केले आहेत. या माध्यमातून कंपनी जिओ, एअरटेल या दिग्गज कंपन्यांना टक्कर देत आहे.

Advertisement

BSNL ने 4 स्पेशल प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. चारही BSNL चे किफायतशीर रिचार्ज प्लॅन आहेत. 4 पैकी 3 रिचार्ज प्लॅन 200 रुपयांपेक्षा कमी आहेत, तर एक प्लॅन 347 रुपयांचा आहे. 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतात. तर 347 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 56 दिवसांची आहे. कंपनीने 200 रुपयांपेक्षा कमी म्हणजेच 184 रुपये, 185 रुपये आणि 186 रुपयांचे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. टेलिकॉम टॉकने दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे.

Advertisement

बीएसएनएलच्या 184, 185 आणि 186 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तिन्ही प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा, 100 SMS सुविधा आणि अमर्यादित कॉल फायदे उपलब्ध आहेत. डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 80Kbps पर्यंत कमी होतो. जर आपण या तीन प्लॅनमधील फरकाबद्दल विचार केला तर या प्लानमध्ये बीएसएनएल ट्यूनसह अन्य काही फायदे मिळतील.

Loading...
Advertisement

बीएसएनएलच्या 347 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 112GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल फायदे उपलब्ध आहे.

Advertisement

अर्र.. ही काय भानगड..? ; BSNL अन्य कंपन्यांच्या ग्राहकांना देणार मोफत इंटरनेट डेटा; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply