Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सुट्ट्यांमुळे देशभरातील बँकांचे कामकाज विस्कळीत; दोन दिवस काही ठिकाणी बँका राहणार बंद; चेक करा..

मुंबई : आरबीआयने या वर्षाच्या सुरुवातीआधी जानेवारी 2022 मध्ये बँक सुट्ट्यांची यादी जारी केली होती. या यादीनुसार जानेवारी 2022 मध्ये एकूण 16 दिवस बँका बंद राहतील. या क्रमाने या आठवड्यात 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. जर तुम्ही देखील बँकेशी संबंधित कोणतेही काम करणार असाल तर प्रथम ही यादी नक्की पहा.

Advertisement

जानेवारी 2022 मध्ये जानेवारीमध्ये एकूण 16 दिवस बँक सुट्ट्या असतील. यातील 4 सुट्ट्या रविवारी, तर 2 महिन्यांतील दुसरी सुट्टी शनिवारी आहे. यातील अनेक सुट्ट्या सातत्याने पडत आहेत. देशभरात 16 दिवस बँकांना आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत.

Advertisement

या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. या महिन्यात देशभरात एकाच वेळी 9 सुट्ट्या येणार आहेत. त्याचवेळी, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. संपूर्ण महिन्याबद्दल विचार केला तर जानेवारी महिन्यात देशातील विविध राज्यांमध्ये 16 दिवस बँका बंद राहतील. याकाळात ग्राहक त्यांच्या संबंधित बँक शाखेत पैसे काढू किंवा जमा करू शकणार नाहीत.

Loading...
Advertisement

दरम्यान, 14 जानेवारी रोजी अहमदाबाद आणि चेन्नई विभागातील बँका मकर संक्रांतीनिमित्त बंद राहतील. तसेच 15 जानेवारी रोजी बंगळुरू, चेन्नई, गंगटोक आणि हैदराबादमध्ये मकर संक्रांतीनिमित्त बँका बंद राहतील. आजही देशात काही राज्यांत बँका बंद आहेत.

Advertisement

जानेवारीत बँकेच्या कामाचे नियोजन करा; जाणून घ्या, या महिन्यात किती दिवस बँका बंद राहतील

Advertisement
Advertisement

Leave a Reply