नव्या वर्षात महागाईचे दिन..! आता साबण, डिटर्जंटच्याही किंमती वाढल्या.. पहा, कोणत्या कंपनीने घेतलाय निर्णय
मुंबई : नव्या वर्षात महागाईने लोकांना चांगलात झटका दिला आहे. नवीन वर्षात एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्सच्या किमती वाढल्या आहेत. त्याच वेळी वॉशिंग मशिनसारख्या गृहोपयोगी वस्तूंच्या किमती या महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलपर्यंत 5-10 टक्क्यांनी वाढू शकतात. Panasonic, LG, Haier सारख्या कंपन्यांनी आधीच किंमतींचा आढावा घेतला आहे. तर Sony, Hitachi, Godrej Appliances सारख्या इतर कंपन्या या तिमाहीच्या अखेरीस निर्णय घेऊ शकतात. या कंपन्या दरवाढ करण्याच्या तयारीत असतानाच नागरिकांना झटका देणारी आणखी एक बातमी आली आहे.
आता साबण, डिटर्जंट खरेदी करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. कारण, देशातील आघाडीची कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीत 3 टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आता व्हील, रिन, सर्फ एक्सेल आणि लाइफबॉय यांसारख्या दैनंदीन गरजेच्या वस्तू घेणे आधिक खर्चिक ठरणार आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
कंपनीने एक्सेल साबणाच्या किंमतीत सर्वाधिक वाढ केली आहे. याआधी 2 रुपये वाढ केली होती. आता मात्र तब्बल 20 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे या साबणाची किंमत 10 रुपयांवरुन 12 रुपये झाली आहे. लाइफबॉयच्या 125 ग्रॅम पॅकची किंमत 29 ऐवजी 31 रुपये झाली आहे. तर पीअर्स साबणाच्या 125 ग्रॅम पॅकची किंमत 76 ऐवजी 83 रुपये झाली आहे. रिनच्या 250 ग्रॅम सिंगल बारची किंमत 18 रुपयांवरुन 19 रुपये केली आहे. बिजनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, नोव्हेंबरमध्ये कंपनीने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलियोमध्ये किंमतीत 1 ते 33 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
राहा तयार..! लवकरच बसणार महागाईचा आणखी एक झटका; ‘त्या’ वस्तू घेणे ठरणार खर्चिक