Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

5G Technology : मुंबई, पुण्यासह देशातील ‘या’ शहरांत सुरू होणार नेटवर्क; चेक करा शहरांची यादी

मुंबई : देशातील टेलिकॉम कंपन्या सध्या 4G मोबाइल नेटवर्क उपलब्ध करुन देत आहेत. जगभरात आता थेट 6G नेटवर्कची तयारी सुरू करण्यात येत आहे. भारतातही या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. मात्र, त्याआधी 5G तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे नियोजन आहे. आता याबाबतीत महत्वाची माहिती मिळाली आहे. देशात मागील दोन वर्षांपासून 5G चाचण्या सुरू आहेत.

Advertisement

या चाचण्या पुढील वर्षात मे महिन्यापर्यंत सुरू राहणार आहेत. देशात 5G फोन तर मिळत आहेत मात्र 5G नेटवर्क अजून मिळालेले नाही. मात्र, आता काहीच महिन्यात देशातील काही शहरांत हे नवे तंत्रज्ञान उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही ठराविक शहरांत ही सेवा सुरू होणार आहे.

Advertisement

बंगळुरू, मुंबई, गुरुग्राम, दिल्ली, अहमदाबाद, हैद्राबाद, पुणे, कोलकाता, चंदीगड, दिल्ली, जामनगर, चेन्नई, लखनऊ आणि गांधीनगर या शहरांमध्ये 2022 मध्ये 5G तंत्रज्ञान सुरू होणार आहे.

Loading...
Advertisement

विशेष म्हणजे, नेटवर्क प्रायोगिक तत्वावर नाही तर थेट व्यावसायिक स्तरावर देण्यात येईल. म्हणजेच, या शहरात शक्यतो पुढील वर्षात 5G नेटवर्क उपलब्ध होईल. या शहरांमध्ये टेलिकॉम कंपन्या मागील दोन वर्षांपासून चाचण्या करत आहेत. यामध्ये व्होडाफोन-आयडीया, एअरटेल, जिओ या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान लवकर उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात आजमितीस 4G तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यामध्ये आता लवकरच 5G तंत्रज्ञान येणार आहे. त्यामुळे इंटरनेटचा वेग आणखी वाढणार आहे. कंपन्यांकडून थेट ग्राहकांना नेटवर्क मिळणार आहे. 5G नेटवर्क जास्त खर्चिक असेल की बजेटमध्ये असेल याबाबत मात्र अद्याप काहीच स्पष्ट नाही.

Advertisement

5G बाबत आलीय मोठी अपडेट; पुणे, मुंबईसह ‘या’ शहरांत मिळणार नेटवर्क; पहा, नेमके काय म्हटलेय दूरसंचार विभागाने

Advertisement
Advertisement

Leave a Reply