Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानचा शहाणपणा..! म्हणालाय भारताविरोधात 100 वर्षे शत्रूत्व नकोच; पहा, नेमके काय घडलेय ?

नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या अनेक संकटांतून जात आहे. कोरोनाचे संकट तर आहेच त्यात आता महागाईने हाहाकार उडाला आहे. विदेशी कर्ज प्रचंड वाढले आहे. कर्ज परत करण्यासाठी आणखी कर्ज घ्यावे लागत आहे. आता तर सरकारने लोकांना त्रास देणारे निर्णय घेतले आहे. महसूल मिळत नाही म्हणून इंधनासह अन्य आवश्यक वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. अर्थव्यवस्था तर पूर्ण डबघाईस आली आहे. अशा अनेक संकटात सापडलेल्या या देशाला आता शहाणपणा येत असल्याचे दिसत आहे.

Advertisement

पाकिस्तानी नेत्यांनी परराष्ट्र धोरण ठरवले आहे. यामध्ये पाकिस्तान शेजारी देशांबरोबर शांतता आणि आर्थिक कुटनितीस प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे. या राष्ट्रीय सुरक्षा नितीमध्ये काश्मीर मुद्द्यावर अंतिम निर्णय घेत भारता बरोबर व्यावसायिक धोरणास पुढे नेण्यात येईल. दोन्ही देशात सध्या दहशतवाद आणि काश्मीर मुद्द्यावरुन तणाव आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून दोन्ही देशांतील तणाव जास्त वाढला आहे. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने एक्सप्रेस ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की आम्ही पुढील 100 वर्षे तरी भारता बरोबर शत्रूत्व पत्करणार नाही. ही नवीन निती शेजारी देशांबरोबर शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आहे. जर काश्मीर मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा झाली तर भारता बरोबर याआधी होता तसा व्यापार सुरू होण्याची शक्यता आहे.

Advertisement

पाकिस्तानच्या धोरणांतील या बदलामुळे दोन्ही देशांतील तणाव कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. पाकिस्तानने जरी असे म्हटले तरी या धोरणाची प्रत्यक्षात अंमलजावणी करणे पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या बदलानंतरही काश्मीरचा मुद्दा हा पाकिस्तानसाठी महत्वाचे राष्ट्रीय धोरण म्हणून ओळखला गेला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, पाकिस्तानच्या तुलनेत भारत खूप पुढे निघून गेल्याचे सत्य आता पाकिस्तानी नेत्यांनी स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. दुसऱ्यांदा असा प्रसंग घडला आहे, ज्यावेळी खान यांनी भारताचे जाहीर कौतुक केले होते.

Advertisement

पाकिस्तान-चीन बिजनेस इन्व्हेस्टमेंट फोरमच्या उद्घाटन समारंभात इम्रान यांनी भारताच्या आयटी क्षेत्राचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते, की आयटी क्षेत्रातील नवीन तांत्रिक क्रांती आता दिसत आहे. त्यामध्ये वीस वर्षांआधी भारत कुठे होता आणि आज या देशाचा निर्यात व्यापार पहा आणि आपण कुठे आहोत याचा देखील विचार करा.

Advertisement

ऐकावं ते नवलच की..! म्हणून चक्क पाकिस्तानने केलेय भारताचे कौतुक; पहा, ‘त्या’ क्षेत्रात पाकिस्तान मागे पडल्याचे केले मान्य

Advertisement
Advertisement

Leave a Reply