JIO चा जबरदस्त प्लान..! ‘त्या’ पद्धतीने कमी पैशात मिळेल 28 GB डेटा; जाणून घ्या, डिटेल
मुंबई : रिलायन्स जिओने यापूर्वी आपले रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली. त्यामुळे लोकांचा रिचार्जवरचा खर्च आता वाढला आहे. पण, जर तुम्ही थोडीशी ‘तडजोड’ केलीत, तर तुम्ही कमी पैशातही जास्त डेटा आणि वैधतेचा फायदा घेऊ शकता. आम्ही रिलायन्स जिओच्या दोन रिचार्ज प्लॅनबद्दल सांगत आहोत. या दोन प्लॅनमधील किंमतीत 20 रुपयांचा फरक आहे. 20 रुपयांच्या या कमी किमतीच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची अतिरिक्त वैधता आणि 28GB अधिक डेटा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया जिओचे हे दोन प्लान कोणते आहेत आणि त्यात काय फायदे आहेत.
Jio च्या 479 रुपये आणि 499 रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती घेणार आहोत, या प्लॅनमध्ये 20 रुपयांचा फरक आहे पण कमी किमतीच्या प्लानचा डेटा आणि वैधता इतर खर्चिक प्लानपेक्षा जास्त आहे.
479 रुपयांचा प्लान
Jio च्या 479 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो, त्यानुसार एकूण 84GB डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेट 64 Kbps च्या वेगाने चालते. या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS मिळतात. याबरोबर JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
499 रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. दैनिक 2GB डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. या प्लॅनमध्ये एकूण 56GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन दिले आहे. त्याच वेळी, या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी दिले जाते, जो या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा आहे.
‘त्यामुळे’ जिओचा होतोय मोठाच फायदा..! ग्राहकांना मात्र बसतोय झटका; जाणून घ्या, काय ‘कॅशबॅक’चे गणित..