Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. बटाटे 200 रुपये किलो.. मिरची 710 रुपये किलो.. पहा, कुठे उडालाय महागाईचा भडका ?

मुंबई : चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेला श्रीलंका सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकट कायम असतानाच आता महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे नवीन वर्षात सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. श्रीलंका जवळपास दिवाळखोर होण्याच्या स्थितीत आला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, महागाई 11.1 टक्क्यांच्या रेकॉर्डवर आहे. श्रीलंकेच्या अॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटने चलनवाढीचा डेटा जारी केला आहे. ज्यामध्ये एका महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement

मागील वर्षात 30 ऑगस्ट रोजी चलन मूल्यात तीव्र घसरण झाल्यानंतर आणि त्यानंतर अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर श्रीलंका सरकारने राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी घोषित केली. चीनसह अनेक देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात श्रीलंकेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘अॅडव्होकाटा इन्स्टिट्यूट’ ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान श्रीलंकेतील खाद्यपदार्थांची महागाई 15 टक्क्यांनी वाढली आहे. श्रीलंकेत 100 ग्रॅम मिरचीची किंमत 18 रुपये होती, ती आता 71 रुपये झाली आहे. म्हणजेच एक किलो मिरचीचा भाव 710 रुपयांवर गेला आहे. मिरचीच्या भावात एकाच महिन्यात 287 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

याशिवाय वांग्याच्या दरात 51 टक्के, तर कांद्याच्या भावात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयातीअभावी येथे लोकांना दुधाची पावडरही मिळत नाही. त्यामुळे एक किलो बटाट्याचा भाव 200 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. या देशात टोमॅटो 200 रुपये प्रति किलो, वांगी 160 रुपये प्रति किलो, भेंडी 200 रुपये, कारले 160 रुपये प्रति किलो, कोबी 240 रुपये प्रति किलो, गाजर 200 रुपये प्रतिकिलो असे भाव वाढले आहेत.

Advertisement

कोलंबो गॅझेटमधील एका अहवालानुसार, गेल्या दशकात श्रीलंकेला दुहेरी नुकसान सहन करावे लागले आहे. एक म्हणजे वित्तीय तूट आणि दुसरी व्यवसाय तूट. 2014 पासून श्रीलंकेवरील विदेशी कर्जही सातत्याने वाढत आहे. 2019 मध्ये हे कर्ज देशाच्या जीडीपीच्या 42.6 टक्क्यांवर पोहोचले होते.

Advertisement

ऐकावं ते नवलंच की; म्हणून भारतापेक्षा पाकिस्तान, श्रीलंका जास्त हॅपी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply