Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारी योजना, खासगी कंपन्यांनी केलेय अर्जांचे शतक; पहा, कोणत्या योजनेस मिळतोय तुफान प्रतिसाद

मुंबई : केंद्र सरकारने मागील वर्षात देशातील ऑटो क्षेत्रासाठी पीएलआय योजना सुरू केली होती. या योजनेस वाहन निर्माता कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 115 कंपन्यांनी अर्ज सादर केले आहेत. प्रगत ऑटोमोटिव्ह उत्पादन क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने ऑटो आणि ऑटो घटकांसाठी पीएलआय योजना मंजूर केली आहे. यावर 25 हजार 938 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

Advertisement

ऑटो क्षेत्रासाठी PLI योजना सध्याच्या ऑटोमोटिव्ह कंपन्या आणि नवीन गुंतवणूकदारांसाठी होती, जे सध्या ऑटो किंवा ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात नाही. योजनेचे दोन घटक आहेत. चॅम्पियन IM प्रोत्साहन योजना आणि घटक चॅम्पियन प्रोत्साहन योजना. चॅम्पियन आयएम ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजन इंधन सेल खरेदीच्या सर्व श्रेणींना लागू असलेली प्रोत्साहनात्मक विक्री किंमत योजना आहे. घटक चॅम्पियन इन्सेंटिव्ह योजना ही प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान उत्पादने, दुचाकी, प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टर यांच्या वाहन गटांना लागू असलेली विक्री किंमत योजना आहे.

Advertisement

कोरोना महामारीच्या काळात जगभरात ऑनलाइन कामकाज वाढले आहे. त्यामुळे स्मार्टफोन लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना मागणी वाढली आहे. तसेच याच काळात वाहन उद्योगावरही मोठे संकट आले आहे. देशात काही कंपन्यांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांची विक्री घटली आहे. वाहनांना जास्त मागणी असतानाही असे घडले आहे, हे विशेष. वाहन उद्योगाला या संकटाचा सामना करावा लागत आहे. सिलीकॉन सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील मोबाइल उद्योग, वाहन उद्योग यामुळे संकटात सापडले आहेत.

Loading...
Advertisement

सेमी कंडक्टरच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी काही योजनाही सरकारने तयार केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात सेमी कंडक्टरचे संकट दूर होईल, असे अपेक्षित आहे.

Advertisement

कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी : कार विमा हप्ता ‘असा’ होईल कमी; जाणून घ्या, काही सोप्या टिप्स

Advertisement
Advertisement

Leave a Reply