Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. टेलिकॉम कंपन्यांचे धमाकेदार प्रीपेड प्लान; दररोज मिळेल 3GB डेटा; चेक करा डिटेल..

मुंबई : Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea कडे सध्या एकापेक्षा जास्त प्रीपेड प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये हाय-स्पीड डेटा आणि फ्री कॉल सारखे फायदे दिले जात आहेत. जर तुम्हाला तुमच्यासाठी योग्य प्लान मिळत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. यामध्ये तीन कंपन्यांच्या प्रीपेड प्लानची माहिती जाणून घेऊ या, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 3 GB पर्यंत डेटा मिळेल आणि प्रीमियम अॅप फ्री सब्सक्रिप्शन मिळेल आणि या प्लान्सच्या किंमती 600 रुपयांपेक्षा कमी आहेत.

Advertisement

जिओचा 419 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
जिओच्या या प्रीपेड प्लानची किंमत 419 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सला दररोज 3 जीबी डेटासह 100 एसएमएस दिले जातील. याबरोबरच यूजर्सना फ्री कॉल सुविधाही मिळणार आहे. याशिवाय वापरकर्ते Jio TV, Movies, Cloud आणि Security सारखे अॅप वापरू शकतील.

Advertisement

एअरटेलचा 599 रुपयांचा प्लान
एअरटेलचा हा प्रीपेड प्लान कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याची किंमत 599 रुपये आहे. यामध्ये यूजर्सना दररोज 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळणार आहेत. वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल करू शकतील. याशिवाय युजर्सना प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम आणि विंक म्युझिक सारख्या उत्कृष्ट अॅप मोफत सब्सक्रिप्शन मिळेल. या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे.

Loading...
Advertisement

व्होडाफोन-आयडीयाचा 475 रुपयांचा प्लॅन

Advertisement

Vodafone Idea चा हा प्रीपेड प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 3 GB डेटा आणि 100 SMS मिळणार आहेत. या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल सुविधा दिली जाईल. याशिवाय यूजर्स व्होडाफोन आयडियाचे प्रीमियम अॅप वापरू शकतील. याशिवाय रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांन डेटा रोलओव्हर सारख्या सुविधाही दिल्या जातील.

Advertisement

‘त्यामुळे’ जिओचा होतोय मोठाच फायदा..! ग्राहकांना मात्र बसतोय झटका; जाणून घ्या, काय ‘कॅशबॅक’चे गणित..

Advertisement
Advertisement

Leave a Reply