मुंबई : सध्या कोरोनाच्या काळात आयपीओला अच्छे दिन आहेत. मागील वर्षात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले. या कंपन्यांनी कोट्यावधींचा उलाढाल केली. गुंतवणूकदारही मालामाल झाले. त्यानंतर आता नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातही काही कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बाजार नियामक सेबीने आणखी दोन कंपन्यांना त्यांचा आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे.
फाईव्ह-स्टार बिजनेस फायनान्स लिमिटेड आणि वारी एनर्जीज लिमिटेड या दोन कंपन्या आहेत. फाईव्ह स्टार बिजनेस फायनान्स ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजेच एनबीएफसी आहे. तर, वारी एनर्जी लिमिटेड ही सोलर एनर्जी क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. सेबीने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अपडेटनुसार, दोन्ही कंपन्यांनी सप्टेंबर ते नोव्हेंबर 2021 दरम्यान आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती. या दोन्ही कंपन्यांना 3 ते 7 जानेवारी दरम्यान सेबीकडून ‘ऑब्जर्व्हेशन लेटर’ मिळाले होते. आयपीओ आणण्यासाठी कोणत्याही कंपनीला सेबीकडून हे लेटर मिळवणे आवश्यक असते.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, मोठ्या गुंतवणूकदारांनी फाइव्ह स्टार बिजनेस कंपनीत गुंतवणूक केली आहे. आयपीओच्या माध्यमातून दोन हजार 752 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे कंपनीचे नियोजन आहे. कंपनीचा आयपीओ ऑफर फॉर सेल अंतर्गत उपलब्ध असणार आहे. ज्या अंतर्गत कंपनीचे विद्यमान शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर ग्रुपच्या कंपन्या आपापले शेअर्स विकतील.
वारी एनर्जीजच्या आयपीओमध्ये, एक हजार 350 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. याशिवाय ऑफर-फॉर-सेलमध्ये (OFS) 40 लाख 7 हजार 500 इक्विटी शेअर्स कंपनीचे विद्यमान शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर्स विक्रीसाठी आणणार आहेत.
दरम्यान, देशात सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. कोरोना काळातही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून पाहता पाहता कोट्यावधींचा निधी गोळा करत आहेत. गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा मिळत आहे. आता पुढच्या वर्षात सुद्धा शेअर बाजारात आयपीओंचा पाऊस पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल 45 कंपन्यांचे आयपीओ येणार असल्याची माहिती आहे. या कंपन्यांनी तयारीही सुरू केली आहे. यामध्ये एलआयसी या सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे नव्या वर्षात गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
‘या’ कंपनीचा तब्बल 1000 कोटींचा आयपीओ येतोय; पहा, कंपनीचे काय आहे नियोजन..