Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी : कार विमा हप्ता ‘असा’ होईल कमी; जाणून घ्या, काही सोप्या टिप्स

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सध्या लोकांना कार खरेदी करणे कठीण झाले आहे. आगामी काळातही कार खरेदीचे प्रमाण कमीच राहिल, असा अंदाज आहे. बहुतेक लोक कर्ज घेऊन कार खरेदी करत आहेत, परंतु कर्ज घेतल्यानंतर दर महिन्याला कर्जाचा हप्ता सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतो. कारण, सध्या वाहनांचा विमा खर्चिक झाला आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हाही तुम्ही कार विम्यासाठी खरेदी करताल तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. या गोष्टींचे पालन करुन तुम्ही तुमचा कार इन्शुरन्स प्रीमियम देखील कमी करू शकता.

Advertisement

सर्वात आधी आपण सर्व कंपन्यांच्या विम्याची तुलना केली पाहिजे. तुम्ही तुमच्या कारचा विमा काढण्यापूर्वी किंवा नूतनीकरण करण्यापूर्वी, बाजारातील सर्व विमा कंपन्यांच्या योजनांची नीट माहिती घ्या. सर्व कंपनीच्या विमा एजंटबरोबर संपर्क साधा आणि तुमच्या जवळचे कोटेशन मिळवा. तुम्हाला ते खर्चिक वाटत असल्यास, इतर कंपन्यांच्या कोटेशनबरोबर त्याची तुलना करा आणि तुम्हाला अनुकूल असलेला विमा घ्या.

Advertisement

तुम्ही कंपनीत गेल्यावर कंपनीकडून सवलत मागा. जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनाचा विमा काढता तेव्हा डीलर किंवा विमा प्रदात्याकडून सवलतीबद्दल माहिती मिळवण्याची खात्री करा. अनेक विमा कंपन्या वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांना अतिरिक्त सवलतही देतात. जर तुम्ही कमी दावे घेतले असतील, तर विमा कंपन्या हे लक्षात घेतात. अशा परिस्थितीत, तुम्ही नो क्लेम बोनससाठी दावा करू शकता.

Advertisement

तुम्ही 6-7 वर्षात मोठा नो-क्लेम बोनस मिळवला असेल आणि नवीन कार खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही तुमच्या जुन्या विमा पॉलिसीवरून NCB ला नवीन कार इन्शुरन्समध्ये बदलून तुमच्या प्रीमियममध्ये लक्षणीय कपात करू शकता.

Loading...
Advertisement

तुम्ही तुमच्यानुसार कार विमा पॉलिसी घ्यावी. जर तुम्हाला विमा प्रीमियम कमी करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पॉलिसी कस्टमाइज करू शकता. तथापि, कंपन्या काही पॅकेजेस देखील ऑफर करतात. जसे की इंजिन सुरक्षितता, वैयक्तिक वस्तूंच्या नुकसानासाठी दावा. यामुळे तुमचा प्रीमियम वाढतो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्यानुसार कमी प्रीमियम असलेली पॉलिसी निवडू शकता.

Advertisement

तुम्ही ‘अँटी थेफ्ट’ उपकरण असलेली कार खरेदी करण्याकडे लक्ष द्यावे. हे तुमची मोठी बचत करेल. तुम्ही विचाराल कसे ? जर तुमची कार जीपीएस आणि अन्य उपकरणांनी सुसज्ज असेल, ज्यामुळे कार चोरीचा धोका कमी होतो. तर तुम्ही अशा कार खरेदी कराव्यात, यामुळे तुम्हाला कार खरेदीसाठी थोडे जास्त पैसे द्यावे लागतील पण, तुमच्या विमा पॉलिसीचा ताण देखील थोडा कमी होईल.

Advertisement

तुम्ही बाहेरून कार मॉडिफाय करून घेऊ नये. बर्‍याचदा आजकाल लोक त्यांच्या कार किंवा दुचाकीमध्ये त्यांच्या पसंतीनुसार बदल करतात. असे केल्याने तुमच्या कारची वॉरंटी रद्द होते. विमा कंपन्याही त्यांचा प्रीमियम वाढ करतात. त्यामुळे जर तुम्हाला खर्च टाळायचा असेल तर कारमध्ये बदल करणे शक्यतो टाळले पाहिजे.

Advertisement

काम की बात : विमा आहे महत्वाचा.. पहा, कोणत्या प्रकारचे विमा आहेत गरजेचे; जाणून घ्या, महत्वाची माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply