Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फक्त आपल्याकडेच कुठे आहे महागाई..? ; दरवाढीने अवघ्या जगातील लोक हैराण; पहा, किती वाढल्यात किंमती ?

नवी दिल्ली : देशात इंधनाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. महागाईने लोक हैराण झाले आहेत. कोरोनाचे संकटात हे नवीन संकट आले आहे. फक्त आपल्याकडेच असे नाही तर अवघ्या जगातील लोकच महागाईने हैराण झाल्याचे समोर आले आहे. तेल, दूध आणि साखरेच्या वाढत्या किमतींनी केवळ आपणच नाही तर सारे जग या महागाईने हैराण झाले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) मते, डिसेंबर 2021 मध्ये जागतिक खाद्य पदार्थांच्या किमती महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर थोड्या कमी झाल्या, परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत 2020 मध्ये या किंमती जास्त होत्या.

Advertisement

सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, संयुक्त राष्ट्र एजन्सीचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञांनी सांगितले की, 2021 मध्ये FAO अन्न किंमत निर्देशांक 2020 च्या तुलनेत 28.1 टक्क्यांनी जास्त होता. जागतिक धान्याच्या किमती 2012 नंतरच्या सर्वाधिक पातळीवर आहेत. 2020 च्या किमतींपेक्षा सरासरी 27.2 टक्क्यांनी जास्त आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये भाजीपाला आणि तेलाच्या किमती 65.8 टक्क्यांनी वाढल्या, साखरेच्या किमती 2016 नंतर सर्वाधिक पातळीवर आहेत. दुग्धजन्य पदार्थांच्या किमती 2020 च्या तुलनेत 16.9 टक्क्यांनी जास्त होत्या.

Advertisement

मका 44.1 टक्के आणि गव्हाच्या दरात 31.3 टक्के वाढ झाली. जगातील इतर प्रमुख खाद्य पदार्थांपैकी एक असलेल्या तांदूळात 4 टक्क्यांनी घट झाली आहे. कमी जागतिक आयात मागणीमुळे भाजीपाला तेलाच्या किमतीचा निर्देशांक डिसेंबरमध्ये 3.3 टक्क्यांनी घसरला. संपूर्ण वर्षासाठी तेल निर्देशांकाने 2020 च्या तुलनेत 65.8 टक्क्यांच्या वाढीसह सर्वकालीन रेकॉर्ड केले.

Loading...
Advertisement

दरम्यान, जगभरात अजूनही महागाईचे संकट कायम आहे. भारतासह शेजारील देशात तर महागाईने लोक हैराण झाले आहेत. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी संबंधित सरकारे प्रयत्न करत आहेत. त्यात आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

अर्र..घ्या आता.. सरकारमुळेच वाढणार महागाई; म्हणून पाकिस्तान सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply