Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आज सोने आणि चांदीचे दरात पुन्हा घट; जाणून घ्या, देशातील सोने मार्केटमध्ये काय आहे परिस्थिती

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मागील काही दिवसांपासून सोन्यास मागणी वाढली आहे. मात्र, तरी सुद्धा सोने आणि चांदीचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत. आज शुक्रवारी सुद्धा सोन्याचे दरात मोठी घसरण दिसून आले. राष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 284 रुपयांनी कमी झाले. तर चांदीच्या दरात 1292 रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे सध्या चांदीचे दर 59 हजार 590 रुपये प्रति किलो असे आहेत.

Advertisement

एचडीएफसी सिक्युरिटीज नुसार, आंतरराष्ट्रीय बाजारतही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घसरण दिसून आली आहे. काल (बुधवारी) 46,984 रुपयांवर 10 ग्रॅम सोन्याचे भाव पोहोचले होते. तर प्रति किलो चांदीला 60,882 रुपयांचा भाव मिळाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,800 डॉलर प्रति औंस वर ट्रेडिंग करत आहे. तर चांदी 22.34 डॉलर प्रति औंस स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय अर्थ घडामोडींचे थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर जाणवत असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

राजधानी दिल्ली शहरात सोने 46,700 रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदी 59,590 रुपये प्रति किलो असे दर आहेत. मुंबईमध्ये सोने 48,450 रुपये आणि चांदीचे दर 60,453 असे आहेत. कोलकाता मध्ये सोने 48,450 रुपये तर चांदी 61,000 रुपये प्रति किलो असे नवे दर आहेत.

Loading...
Advertisement

कोलकातामधील सोने बाजार देशात प्रसिद्ध आहेत. कोलकातामध्ये सोन्याची किंमत 48,450 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचली आहे. तर चांदी प्रति किलो 61,000 रुपये असे दर आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सोन्याला प्रति 10 ग्रॅम 48,450 रुपये भाव मिळाला. तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 60,435 रुपयांवर पोहोचला आहे.

Advertisement

‘त्यामुळे’ सोने पुन्हा आलेय 48 हजारांच्या आत; पहा, आज काय घडलेय सोने मार्केटमध्ये

Advertisement
Advertisement

Leave a Reply