Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : ‘स्टार्टअप’ ठरणार रोजगाराचे केंद्र; 4 वर्षात मिळणार ‘इतके’ रोजगार; पहा, काय आहे मोदी सरकारचा प्लान

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या प्रोत्साहन विभाग (DPIIT) ने म्हटले आहे, की सरकार देशातील स्टार्टअप युनिट्सना आणखी प्रोत्साहन देऊन येत्या चार वर्षांत 20 लाख नवीन रोजगार संधी निर्माण करू इच्छित आहे. विभागाचे सचिव अनुराग जैन यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. सरकार स्टार्टअपना प्रोत्साहन देईल, ज्यामुळे पुढील चार वर्षांत (2025 पर्यंत) 20 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सरकारकडे नोंदणीकृत स्टार्ट-अप युनिटमध्ये 6.5 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

Advertisement

DPIIT ने 2016 पासून 60 हजारांहून अधिक स्टार्टअप नोंदणी केली आहे. ते म्हणाले, की प्रत्येक स्टार्टअपमध्ये सरासरी 11 लोक काम करतात. स्टार्टअप आपल्या देशात क्रांतिकारी बदल घडवत आहेत. नोकरी शोधणारे नोकरी देणारे बनत आहेत. सरकारचा अंदाज आहे, की स्टार्टअप क्षेत्रातील थेट नोकऱ्यांमुळे सरासरी तीन अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. विभागाच्या कामगिरीबद्दल माहिती देताना जैन म्हणाले की, 14 क्षेत्रांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजना गेल्या काही महिन्यांत जारी करण्यात आल्या आहेत. देशातील व्यवसाय सुलभतेचे वातावरण आणखी सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करेल.

Advertisement

आगामी काळात थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) अधिक सुलभ करण्याचा विचार आहे. याशिवाय, सरकारी खरेदीच्या धोरणाद्वारे देशांतर्गत मूल्य-अ‍ॅडिशनला चालना दिली जाईल. बौद्धिक संपदा अधिकार (IPR) व्यवस्था बळकट करून देशात नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे, लॉजिस्टिक प्रकल्पांना गती देण्यासाठी विभागांमधील समन्वयासाठी पीएम गति शक्ती योजना, ई-कॉमर्स आणि राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणाला अंतिम रूप देणे, परख पोर्टल आणि प्रयोगशाळांची मान्यता देण्याच्या व्यवस्थेत अपडेशन करण्याचे सरकारचे उद्दीष्ट असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दरम्यान, कोरोना काळात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या काळात अनेकांनी रोजगार गमावले त्यामुळे देशात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करणे आता गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे.

Advertisement

EPFO ने दिलीय महत्वाची माहिती; ऑक्टोबर महिन्यात देशात ‘इतके’ नवे सदस्य; रोजगारात होतेय वाढ

Advertisement
Advertisement

Leave a Reply