Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नव्या वर्षात जोरदार झटका.. ‘या’ कंपनीच्या मोटारसायकल ठरणार जास्त पैशांच्या; पहा, किती केलीय दरवाढ

मुंबई : नव्या वर्षात महागाई कमी होईल असे वाटत असतानाच अनेक कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला. जवळपास सर्वच वाहन कंपन्यांनी किंमतीत मोठी वाढ केली आहे. त्यानंतर आता देश विदेशात लोकप्रिय असलेल्या रॉयल एनफिल्ड कंपनीनेही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या सर्व मोटरसायकलच्या सर्व प्रकारांच्या किमतींमध्ये जोरदार वाढ केली आहे. रॉयल एनफिल्डने आपल्या दुचाकींच्या किमतीत तब्बल 8,408 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन वर्ष सुरू होताच कंपन्या किंमत आणि इतर अनेक कारणे सांगून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढ करण्याचा ट्रेंड जवळपास सर्वच वाहन उत्पादकांमध्ये बनला आहे.

Advertisement

रॉयल एनफिल्डच्या काही मोटारसायकलना जबरदस्त मागणी आहे. आता मात्र ही वाहने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने क्लासिक 350, Meteor 350, Bullet 350, Continental GT 650, Interseptor 650, Himalayan या सर्व प्रकारच्या दुचाकींच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे.

Advertisement

मागील वर्षभरात अॅल्यूमिनियम, तांबे आणि अन्य धातूंसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे कंपन्यांनी ग्राहकांनाही त्रास देण्याचे ठरवले आहे. वाहनांच्याा किंमतीत वाढ केली आहे. होंडाच नाही तर अन्य बऱ्याच दुचाकी आणि चारचाकी वाहन कंपन्यांनी नव्या वर्षात दरवाढ करणार असल्याचे म्हटले आहे.

Loading...
Advertisement

या कंपन्यांनी किंमतीत वाढ केल्याने आता दुचाकी खरेदी करणेही सोपे राहिलेले नाही. कारण, आधीच इंधनाच्या दरवाढीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आता कंपन्यांनी मनमानी करत वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. अशा परिस्थितीत आता अनेक जणांनी इलेक्ट्रिक वाहनांचा विचार सुरू केला आहे.

Advertisement

घर-कार खरेदी सध्या नकोच..! म्हणून लोक टाळताहेत मोठा खर्च; पहा, नेमके काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात

Advertisement
Advertisement

Leave a Reply